कुणासाठी करतोय..,म्हणत 'लेडी सिंघम'ने संचारबंदी तोडणाऱ्यांना चोपले, पाहा हा VIDEO
कुणासाठी करतोय..,म्हणत 'लेडी सिंघम'ने संचारबंदी तोडणाऱ्यांना चोपले, पाहा हा VIDEO
नगरकरांनी कायदा मोडत भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. सरकार आपल्या परीने सर्व प्रयत्न करत असल्याने नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे
अहमदनगर, 24 मार्च : अहमदनगर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लावली आहे. मात्र, काहीजण कुठलेही काम नसताना फिरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती पवार स्वतः रस्त्यावर उतरल्या आहे. कायदा मोडणाऱ्या नागरिकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 144 कलम सह संचारबंदी लागू केले आहे. मात्र, नगरकरांनी कायदा मोडत भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. सरकार आपल्या परीने सर्व प्रयत्न करत असल्याने नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असं चित्र नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले. यातच भाजीपाला विक्री त्यांनी आपल्या भाज्यांचे दर वाढले आहेत.
दरम्यान, पुण्यात संचारबंदीत पोलिसांनी प्रबोधन तरी किती करायचं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिक आहेत, गुन्हेगार नाहीत म्हणून मारायचं नाही, असं ठरवलं तरी लोक ऐकत नाहीत. गरज नसताना रस्त्यावर गाड्या घेऊन येत आहेत. मात्र आम्हाला काही होत नाही म्हणत हिरोगिरी करत फिरणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी चांगल वठणीवर आणलं आहे.
येरवडा पोलिसांच्या टीमने विनामास्क कारण नसताना फिरणाऱ्या दोन तरुणांना थेट टीशर्ट काढूनच तोंडावर बांधायला लावला. पोलिसांच्या या हटके शिक्षेमुळे तरी लाज वाटून हे हिंडफिरे हिरो रस्त्यावर येणार नाही, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.