Home /News /maharashtra /

स्टेशनवर झोपले, तिथूनही हकलले; जंगलाच्या शेजारी भुसावळचे 47 भाविक अडकले

स्टेशनवर झोपले, तिथूनही हकलले; जंगलाच्या शेजारी भुसावळचे 47 भाविक अडकले

गेल्या दोन दिवसांपासून हे भाविक ज्या मध्यप्रदेश सीमेवर अडकून पडले आहे.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी भुसावळ, 24 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे.  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील 47 भाविक मध्य प्रदेशच्या सीमेवर अडकले आहे. भुसावळ तालुक्यातल्या ग्रामीण भागातून 47 भाविक रेल्वेद्वारे तीन धाम यात्रेसाठी गेले होते. मात्र, दिनांक 22 मार्चपासून रेल्वे बंद झाल्याने हे भाविक पुढील यात्रा रद्द करत खाजगी बसद्वारे भुसावळकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने देशभरातील राज्य सीमा सील करण्यात आला आहेत. त्यामुळे इलाहाबादवरून भुसावळकडे येत असताना या भाविकांची बस मध्यप्रदेश सीमेवर रोखण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे भाविक ज्या मध्यप्रदेश सीमेवर अडकून पडले आहे तो जंगलाचा भाग आहे. जवळच असलेल्या एका छोट्या रेल्वे स्थानकावर एक रात्र या भाविकांनी काढली. मात्र, रेल्वे पोलिसांनी तिथून त्यांना हाकलून लावल्याने आता हे भाविक रस्त्यावर आले आहे. तसंच जवळील असलेल्या खाण्याच्या साहित्यावर भाविकांनी दोन दिवस काढले. मात्र, आता हे साहित्य संपत आल्याने अन्न आणि पाणी संपत असल्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण  निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आमची सुटका करावी, अशी विनंती भाविकांनी केली आहे. संचारबंदी असूनही लोकांची गर्दी दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव येथे आठवडे बाजार भरवण्यात आला. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला विक्रीसाठी गर्दी न करता मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, वरण गावातील आठवडे बाजारात लोकांची होत असलेली गर्दी पाहता काही सुज्ञ नागरिकांनी या विरोधात प्रशासनाकडे तक्रार केली. संचारबंदी लागू असतानाही वरणगावमध्ये आठवडी बाजारात नागरिकांनी गर्दी केल्याने काही सुज्ञ नागरिकांनी या विरोधात प्रशासनाकडे तक्रार दिली. मात्र, तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. काहीवेळाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तक्रारदार नागरिकांनी 144 लागू असतानाही नागरिकांची होत असलेल्या गर्दी विरोधात आणि त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने तीव्र रोष व्यक्त केला तसंच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या