Home /News /maharashtra /

BREAKING - दिवसभरात मुंबईत कोरोनाव्हायरसचे नवे 47 रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 170 वर

BREAKING - दिवसभरात मुंबईत कोरोनाव्हायरसचे नवे 47 रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 170 वर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाव्हायरसचे (coronavirus) एकूण 220 रुग्ण आहेत.

    मुंबई, 30 मार्च : राज्यात (maharashtra) कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांच्या मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर मुंबईत कोरोनाव्हायरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 47 नवे रुग्ण आढळून आलेत. मुंबईतील नागरिकांना आता अधिकच सजग राहण्याची गरज आहे. दिवसभरात तब्बल 47 रुग्ण सापडलेत, ज्यामध्ये मुंबईतील 38 आणि मुंबईबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे. राज्यात आज कोरोनाव्हायरसमुळे 2 रुग्णांचे मृत्यू झालेत.  मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात 78 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. राज्यातील 39 रुग्णांची तब्येत बरी झाली, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा - मुंबईत लॉकडाऊन अधिक कडक, अनेक भागांमध्ये SRPF च्या तुकड्या तैनात देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1071 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 10 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. सर्वाधिक 220 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सगळ्यात भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 102 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं कोरोनाला हरवणे शक्य असल्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात 102 रुग्ण निरोगी झाल्यामुळं भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे. हे वाचा - डोंबिवलीकरांसाठी तो एक दिवस ठरला कोरोनाचा वाहक, आणखी एकाला झाली लागण
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या