अलिबाग येथे 3 जण निरीक्षणाखाली, कामासाठी गेले होते दुबईला

अलिबाग येथे 3 जण निरीक्षणाखाली, कामासाठी गेले होते दुबईला

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे 3 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

  • Share this:

रायगड,16 मार्च:रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे 3 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत, असं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तिघे कामानिमित्त दुबईला गेले होते. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांना निगराणी कक्षात दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, तिघे कामानिमित्त दुबई येथे कामानिमित्त गेले होते. 14 मार्च रोजी ते परत आले होते. याबाबत प्रशासनाला माहिती मिळाताच त्यांनी तातडने अलिबाग येथे नव्याने स्थापन केलेल्या सारंग विश्रामगृहातील निरीक्षण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या गंभीर लक्षणे दिसून आली नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. नागरिकांनी भयभित होऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

हेही वाचा..पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासा, कोरोनासंदर्भात समोर आला मोठा अहवाल

कोरोना व्हायरसबाबत देशभर आणि राज्यात हाय अलर्ट असताना सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन मात्र याबाबतीत अत्यंत हलगर्जी असल्याचं दिसत आहे. सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आदेश असतानाही सिंधुदुर्गात रविवारी  पार पडलेल्या कुणकेरी हुडोत्सवाच्या जत्रेत आम्हाला दक्षिण आफ्रिका ते दुबई असा प्रवास करून 6 मार्चला मुंबईत आणि त्यानंतर सिंधुदुर्गातल्या गावच्या जत्रेत आलेला एक जहाज कर्मचारी आढळलाय. विशेष म्हणजे कुणकेरी हुडोत्सवाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीत मिसळलेल्या या कर्मचाऱ्याला अद्यापही जिल्हा प्रशासनाने संपर्क केलेला नाही. दुबई विमानतळावर चार तास वास्तव्य केलेल्या या कर्मचाऱ्याची मुंबई विमानतळावर केवळ जुजबी तपासणी झाल्याचं खुद्द या कर्मचाऱ्यानेच सांगितल आहे.

कोल्हापूरमध्ये झाला कोरोना संशयिताचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. सर्व चाचण्या झाल्यानंतर रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मृत्यूचं नेमकं कारण काय असावं याचा डॉक्टर शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे रक्ताचे नमुने टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले होते. आज अहवाल येणार होता. पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. खरंतर कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आजाराची लागण झाल्याच्या धक्क्यामुळे व्यक्तीचा जीव गेला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील असून कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं राहायची. 8 मार्च ते 15 मार्च संशयित रुग्णाने हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. त्यानंतर नागाव इथं परतल्यानंतर व्यक्तीला आजार सुरू झाला. कोरोना झाल्याची लक्षणं दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण अहवाल येण्याआधीच व्यक्तीचा मृत्यू झाला.

दरम्यान, डॉक्टरांनी व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला असून त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा.. भारतात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, 4 देशांनंतर आता पाकिस्तान बॉर्डरही करणार सील

काल रात्री पिंपरी चिंचवड येथील 5 आणि आज सकाळी औरंगाबाद येथील 1 रुग्ण कोरोनाबाधित आला. तसंच सायंकाळी पिंपरी चिंचवडमधीलही एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33 झाली असून औरंगाबाद मधील रुग्णालयात भरती असलेल्या 59 वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.

राज्यात आज 95 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 584 विमानांमधील 1 लाख 81 हजार 925 प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण 1043 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 759 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 669 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 33 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये 75 संशयित रुग्ण भरती आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2020 09:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading