Home /News /maharashtra /

VIDEO: ओढ तुझ्या भेटीची...राज्यातल्या मंदिरांमध्ये आजपासून दर्शन, भाविकांची तुफान गर्दी

VIDEO: ओढ तुझ्या भेटीची...राज्यातल्या मंदिरांमध्ये आजपासून दर्शन, भाविकांची तुफान गर्दी

थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटाझर सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींचं पालन करून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

    शिर्डी, 16 नोव्हेंबर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. तब्बल 8 महिन्यांनंतर आता मंदिरं भाविकांसाठी नियम आणि अटींचं पालन करून उघडण्यात आली आहेत. मुंबईचं सिद्धीविनायक मंदिर, शिर्डीतील साई मंदिर आणि पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. पाडवा आणि भाऊबिजेच्या शुभ मुहूर्तावर ही मंदिरं खुली करण्यात आल्यानं रात्री उशिरापासून दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटाझर सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींचं पालन करून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराची कवाडे आज अखेर उघडली आहे. साईमंदिरात दिवसभरात केवळ सहा हजार भाविकांना दर्शन दिले जाणार, तीन हजार भाविकांना ऑनलाईन पेड पास बुक करावा लागणार, दोन हजार भाविकांना शिर्डीत ऑफलाईन पास दिला जाणार आणि एक हजार ग्रामस्थांना दररोज दर्शन दिले जाणार आहे. मंदिरांमध्ये गर्भवती महिला, लहान मुलं आणी 65 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्धांना प्रवेश मिळणार नाही. दुसरीकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही पहाटेपासून दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहे. विठुरायाचा गाभारा सुंदर ऑर्किड, झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. पाचशे किलो सुंदर फुलांची सजावट केली आहे. आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीजनिमित्तानं भाविकांसाठी आजपासून दर्शन सुरू होत आहे. हे वाचा-कोरोनाशी 2024 पर्यंत करावा लागेल सामना, लस येईल पण ती मिळणार का आपल्याला? सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली की, 'सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे.' भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असल्याचंही बांदेकर म्हणाले. सिद्धिविनायक मंदिरात केवळ मुंबईतूनच नाही तर राज्यभरातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Maharashtra, Vitthal mandir pandharpur

    पुढील बातम्या