रुग्णालयातून पळालेला कोरोना संशयित डॉक्टर बेशुद्ध, आता आहे व्हेंटिलेटरवर

रुग्णालयातून पळालेला कोरोना संशयित डॉक्टर बेशुद्ध, आता आहे व्हेंटिलेटरवर

कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतात 190 हून अधिक रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रात जवळपास 45 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

जळगाव, 20 मार्च : कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतात 190 हून अधिक रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रात जवळपास 45 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याच परिस्थितीमध्ये एक धक्कादायक केस समोर आली आहे ती एका डॉक्टरची. कोल्हापूरहून भुसावळला आलेल्या 30 वर्षीय डॉक्टरची प्रकृती अचानक खालवल्यामुळे खळबळ उडाली. या डॉक्टरला ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली नाही असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र काही तासांतच डॉक्टर बेशुद्ध पडल्यानं त्यांना जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सध्या असलेली लक्षणं ही कोरोना व्हायरससोबत जुळणारी असल्यानं त्यांच्या काही टेस्ट पुन्हा केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या 30 वर्षीय डॉक्टरची प्रकृती खालवली आणि बेशुद्ध येऊन पडला. त्यानंतर त्यांना थेट जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 30 वर्षांचा हा डॉक्टर कोणताही परदेशी दौरा करून आला नव्हता अथवा परदेशी दौरा केलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला नव्हता.  तरीही त्यांचे सीमटर्म हे कोरोना व्हायरसला समांतर जाणारे आहेत. मात्र कुटुंबियांचा दावा आहे की त्यांना कोरोना व्हायरस नाही. मात्र डॉक्टरांनाही आता प्रश्न पडला आहे. काही चाचण्यांनंतर हा गोंधळ अधिक स्पष्ट होईल असं जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर आपल्याला कोरोना होईल या भीतीनं या डॉक्टरने चार रुग्णालयातून पळ काढला होता अशीही एक माहिती समोर आली आहे.

हे वाचा-भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मास्क आणि सेनिटायझरचा अवैध साठा जप्त

देशात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारने महत्त्वाच्या काही सचूना जाहीर केल्या आहे. राज्यातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारनं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

इटलीमध्ये मृत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या चीनपेक्षा इटलीमध्ये मृतांची संख्या जास्त आहे. एकाच दिवशी इटलीमध्ये 427 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. यामुळे इटलीमधील मृतांचा आकडा 3405 झाला आहे. तर, 3245 लोकांची परिस्थिती चिंताजनक आहे.

हे वाचा-Coronavirus चा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला, शेअर केला एअरपोर्टवरील अनुभव

First published: March 20, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या