मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साताऱ्यापाठोपाठ 'या' जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 12 टक्क्यांवर, कडक Lockdown लागू

साताऱ्यापाठोपाठ 'या' जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 12 टक्क्यांवर, कडक Lockdown लागू


अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

Lockdown in Sangli and Satara: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सांगली आणि साताऱ्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

सांगली, 3 जुलै : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Coronavirus third wave) धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Sangli) आणि साताऱ्यात (Satara) दैनंदिन रुग्णसंख्या वाढतच असल्याचं दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सांगलीतील लॉकडाऊन (Lockdown in Sangli) वाढवण्यात आला आहे. 12 जुलैपर्यंत आता कठोर निर्बंध लागू असणार आहेत. कालच साताऱ्यातील कठोर निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आता सांगली जिल्ह्यात चौथ्या स्तराचे निर्बंध लागू असणार आहेत.

सांगलीतील पॉझिटिव्हिटी दर तब्बल 12 टक्क्यांवर

सांगली जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ काही थांबत नाहीये. सांगलीतील रुग्ण पॉझिटिव्हिटी दर हा 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोविड पॉझिटिव्हिटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये 1 ते 5 स्तरांमध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटिव्हिटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत. 26 जून 2021 आणि 3 जुलै 2021 रोजी संपणाऱ्या सलग दोन आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटी दर 10 टक्के पेक्षा जास्त व 20 टक्के पेक्षा कमी आहे.

मोठी बातमी: पॉझिटिव्हिटी रेट वाढला; साताऱ्यात आता कडकडीत Lockdown, पाहा नवे नियम

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापणा बंद

चौथ्या स्थरातील निर्बंध लागू करण्यात आल्याने आता सांगली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापणा बंद राहणार आहेत. किराणा दुकान, सलून, मॉल, बेकरी यांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यात 28 जून ते 5 जुलै या कालावधीत लॉकडाऊन होत जाहीर करण्यात आला होता. आता हा लॉकडाऊन 12 जुलैपर्यंत करण्यात आला आहे.

सांगलीतील कोरोनाची स्थिती

जिल्ह्यात आज दिवसभरात 1124 कोरोना रुग्णांची नोंद

म्युकरमायकोसिसचे रुग्ण - एकूण रुग्ण 295, आजचे रुग्ण 2, आज मृत्यू 1

जिल्ह्यात आज कोरोनामुळे 12 रुग्णाचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 4120 वर

जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण संख्या - 9880

आज कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या - 935

आजपर्यंत एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या - 134911

First published:

Tags: Coronavirus, Sangli, Satara