मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Coronavirus ने वाढवली चिंता; 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध लागू, एकत्र जमण्यास होऊ शकते बंदी

Coronavirus ने वाढवली चिंता; 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध लागू, एकत्र जमण्यास होऊ शकते बंदी

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे स्थानिक प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकत्र येण्यावर बंदी घालावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: कोरोनाव्हायरची दुसरी लाट (Second wave of coronavirus) देशाला चांगलीच महागात पडली. या लाटेच्या तडाख्यातून जेमतेम सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसू लागली आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात  डेल्टा प्लसच्या रूपाने (Delta plus variant of coroanvirys) चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा मोदी सरकारने दिला आहे. देशात सध्या लागू असलेले कोरोना निर्बंधच 30 सप्टेंबरपर्यंत कायम राहतील, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) दिले आहेत.

ज्या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रकोप वाढतो आहे, त्यांनी स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेत निर्बंध लागू करावेत, अशी सूचनाही केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा वरचा क्रमांक आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वात भयंकर परिणाम महाराष्ट्रात दिसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दोनच दिवसांपूर्वी दिला होता. गेल्या काही दिवसांत केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांनीही टेन्शन वाढवलं आहे. पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर दोन्ही वाढत असल्याने तिसरी लाट आणखी भयंकर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या आहेतच तेच कोरोनाचे निर्बंध पुढचा महिनाभर कायम राहतील असे आदेश काढण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गणेशोत्सवासारखा मोठा सण सप्टेंबरमध्ये येतो आहे. केरळमध्ये ओणमनंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. तीच परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवू नये म्हणून गणेशोत्सवात एकत्र जमण्यावर कडक निर्बंध घालावेत, अशी सूचना केंद्र सरकारने राज्याला केली आहे.

या 5 जिल्ह्यांत आहेत सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण; पुणे पहिल्या क्रमांकावर

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत (Mumbai Corona Update) दररोज 350 ते 400 रुग्णांची भर पडत आहे. तर, संपूर्ण राज्यभरातून दररोज 3500 ते 4000 नवे रुग्ण समोर येत आहेत. राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 51 हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत.

 कोविड रुग्णांच्या संपर्कातील हे दिवस धोक्याचे; कोरोना संसर्गाची सर्वाधिक शक्यता

या जिल्ह्यांत आहे सर्वाधिक सक्रिय रुग्ण -

पुणे जिल्हा-13715

ठाणे जिल्हा- 7082

अहमदनगर--5295

सातारा-5254

सांगली--4876

दोनच दिवसांपूर्वी केंद्राने महाराष्ट्र सरकारला कोरोनाबाबत सावध करत चिठ्ठी लिहिली होती. महाराष्ट्र आणि केरळमध्ये (Maharashtra and Keral) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) वाढणारी संख्या पाहता केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात केंद्राने राज्यांना चिठ्ठी लिहिली आहे. आणि संसर्ग कसा कमी करता येऊ शकेल, याबाबत 5 सूचना दिल्या आहे. या पाच सूचनांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी कन्टेन्मेंट स्ट्रेटजी, टेस्टिंग, जीनोमिक सर्विलान्स, वॅक्सीनेशन, जिल्हा स्तरावर कसं काम केलं जावं, याची माहिती दिली आहे. (Center warns Kerala and Maharashtra Here are 5 important tips to prevent corona infection )

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी महत्त्वाची, देशात तिसऱ्या लाटेचे संकेत

केंद्राने चिठ्ठीत म्हटलं आहे की, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा येत्या काळात कोरोना रुग्णसंख्येत वाढ करू शकतो. शिवाय जवळील राज्यांनाही याचा त्रास सहन करावा लागेल. केंद्राने राज्य सरकारला आवश्यक पाऊलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. येत्या काळात सणासुदीत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन केंद्राने महाराष्ट्र सरकारला अलर्ट केलं आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी वाढू शकत असल्याने अधिक सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्राने राज्य सरकारवला टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वॅक्सीनेशन आणि कोविड अप्रोप्रियट बिहेव्हियरवर जोर देण्याचं आवाहन केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Ganesh chaturthi, Lockdown