राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचं संकट, जाणून घ्या तुमच्या शहरात कसं असेल हवामान

राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचं संकट, जाणून घ्या तुमच्या शहरात कसं असेल हवामान

कुलाबा शाळेच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार 16 ते 20 एप्रिल दरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गारांचा पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट असताना बळीराजासाठी अस्मानी संकट ओढवणार आहे. पुढचे 5 दिवस अवकाळी पावसासह गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होणार आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रात काही भागात गारांसह पाऊस हजेरी लावणार आहे. तर यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान होणार असल्यानं शेतकी चिंतेते आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा मान्सून चांगला होईल असा एका बाजूला अंदाज वर्तवल्यानंतर आता अवकाळी पावसाचं संकट समोर उभं आहे.

कुलाबा शाळेच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार 16 ते 20 एप्रिल दरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गारांचा पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भामध्ये पूर्व विदर्भात गडचिरोली चंद्रपूर यासह मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी लातूर उस्मानाबाद, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे तर कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा-रतन टाटा यांना 'भारतरत्न' द्या, सोशल मीडियावर ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा

महाराष्ट्रात गेले काही दिवस कमाल तापमान पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोचला आहे तर त्याच वेळी मागील आठवड्यामध्ये देखील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. पश्चिम आणि कोकणात आंबा उत्पादक मोठ्या संख्येने आहेत या भागात पावसाचा तडाखा बसणार असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावं लागत आहे.

दरवर्षी मान्सून पहिल्यांदा केरळमध्ये येतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात. यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे 1 जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून 4 जून पंजाब 7 जून, हैदराबाद 8 जून, पुणे 10 आणि मुंबई 11 जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत 27 जूनला पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदलांमुळे यावेळी मान्सून दहा दिवस उशीरा निघेल असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

हे वाचा-जिथे लोकांनी पोलिसांवर केली दगडफेक तिथेच आता कोरोनाचा कहर 24 तासांत 11 पॉझिटिव्ह

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 17, 2020, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading