Home /News /maharashtra /

Weather updates : राज्यातील 'या' भागांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा

Weather updates : राज्यातील 'या' भागांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा

येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

विजेच्या गडगडाटासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागांमध्ये 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    मुंबई, 29 एप्रिल : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगानं फैलावत आहे तर दुसरीकडे वेगानं वातावरणात बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही शहारांमध्ये कमालिची उष्णता तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढचे तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागांमध्ये 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी बरसतील. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे हवामानातील बदल असा दोन समस्यांचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी जळगाव इथे 41. 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे वाचा-नवं संकट! हवेतून पसरतो कोरोना? वुहानच्या 2 रुग्णांलयातील हवेत आढळला व्हायरस पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणात ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. याआधीच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचा माल पडून खराब झाला आणि आता पुन्हा हवामान बदलाचं संकट त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर मुंबई-पुण्यसह अनेक शहरांमध्ये राज्यात तापमानानं चाळीशीपर्यंत पोहोचल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात तसेच वर्धा शहरातही जोरदार पाऊस झाला. दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक पाऊस बरसल्याने गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. आर्वी, देवळी व सेलू तालुक्याच्या काही भागात तुरळक पावसासह गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मंगळवारी रिसोड शहरासह ग्रामीण भागात रिमझिम पाऊस झाला होता. हे वाचा-What An Idea Sir Ji! युट्यूबचा व्हिडीओ पाहून बनवला सॅनिटायझर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: IMD FORECAST, Skymet, Weather update

    पुढील बातम्या