Home /News /maharashtra /

'...अन्यथा पेपरला बसू दिलं जाणार नाही', परीक्षेला जाताना घ्या ही काळजी

'...अन्यथा पेपरला बसू दिलं जाणार नाही', परीक्षेला जाताना घ्या ही काळजी

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी निवड परीक्षा (SSC) घेण्यात येणार आहेत.

    मुंबई, 01 ऑक्टोबर: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी निवड परीक्षा (SSC) घेण्यात येणार आहेत. कर्मचारी निवड समितीने कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या परीक्षेचे स्वरूप ऑनलाइन पद्धतीचे असणार आहे. जे कोणी ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी कोविड-19 चा सेल्फ डिक्लरेशन फॉर्म त्यांच्यासोबत ठेवावा. कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती ही परीक्षा देत नाही ना, याची खात्री करण्यासाठी हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. त्यासोबत हॉल तिकीट आणि ओळखपत्र असणं, हेही तितकेच महत्त्वाचं आहे. डिक्लेरेशन फॉर्ममध्ये परीक्षार्थीचं नाव, परीक्षेचं नाव, रोल नंबर, परीक्षेची वेळ, ठिकाण या सगळ्यांचा उल्लेख असावा. परिक्षार्थींनी संपूर्ण वेळ मास्क घालावा, सॅनिटायझर सोबत ठेवावा. पाण्याची बाटली सोबत ठेवायची असेल, तर ती बाटली पारदर्शक असावी. परीक्षा देणाऱ्यांसाठी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ रोल नंबर आणि लॅब नंबर याची मार्गदर्शक पाटी दिसणार नाही. ही सर्व माहिती वैयक्तिकरित्या त्यांना परीक्षेला बसताना दिली जाईल. परीक्षेला बसताना सोशल डिस्टन्स ठेवणं आवश्यक आहे. जर एखादवेळेस कोणी जवळजवळ येत असेल, तर त्यांना दुसरी जागा दिली जाईल. प्रवेश करताना थर्मो गनने परीक्षा देणाऱ्यांचे तापमान मोजले जाईल. त्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व सामान दिलेल्या ठिकाणी ठेवून परीक्षा. हे वाचा-IPL 2020 : राहुल-मयंकचं वादळ रोखण्यासाठी मुंबईची रणनिती तयार या वेळी, नोंदणीच्या डेस्कवर केवळ उमेदवाराचा फोटो घेतला जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून अंगठ्याचा ठसा घेतला जाणार नाही. त्यांना उपस्थिती पत्रक भरण्यापूर्वी आणि नंतर हात सॅनिटाईज करण्याचा सल्ला देण्यात येईल. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, परीक्षा देणाऱ्यांनी गेट बंद होण्यापूर्वी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चाचणी केंद्रांवर पोहोचल्यानंतर त्यांनी इतरांपासून सहा फूट अंतर राखले पाहिजे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होताना हॉल तिकीट आणि फोटो आयडी सोबत असणे महत्वाचे आहे. परीक्षा देणाऱ्यांनी परीक्षेचा कालावधी संपल्यानंतरच परीक्षा हॉलमधून बाहेर जावे. जर कोणी परवानगी न घेता हॉल सोडला, तर त्याला पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्याची परीक्षा रद्द केली जाईल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या