मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापूर, सातारा आणि सांगली...कोरोनाबाधितांच्या संख्येनं दक्षिण महाराष्ट्राची वाढली चिंता

कोल्हापूर, सातारा आणि सांगली...कोरोनाबाधितांच्या संख्येनं दक्षिण महाराष्ट्राची वाढली चिंता

कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यात दर तासाला रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यात दर तासाला रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यात दर तासाला रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोल्हापूर, 17 जुलै : राज्यभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना दक्षिण महाराष्ट्रातही (South Maharashtra) काही वेगळ चित्र नाही. कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यात दर तासाला रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक स्वयंशिस्त कधी पाळणार असा सवाल उपस्थित होत आहे. सुरुवातीला राज्यातल्या अनेक शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते पण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव लवकर झाला नव्हता. हा शिरकाव झाला 26 मार्च या दिवशी....त्यानंतर मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली होती. पण गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये 24 तासात 190 रुग्ण सापडण्याचं प्रमाण दिसून आल आहे. परिणामी जिल्ह्यातल्या कोरोना बधितांची संख्या आता दीड हजारांपेक्षाही जास्त झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत. काय आहे कोल्हापूरमधील स्थिती? एकूण रुग्ण - 1620 आतापर्यंत मृत्यू - 37 सध्या 20 रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ चलकरंजी चंदगड आणि कोल्हापूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत साताऱ्यातही वेगाने वाढ कोल्हापूर पाठोपाठ सातारा जिल्ह्यातही कोरोनाची काही वेगळी परिस्थिती नाही. सातारा जिल्ह्याने तर 2 हजाराचा आकडा कधीच पार केला आहे, तर 70 जणांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या 72 तासांमध्ये शेकडो नवे रुग्ण सापडले. म्हणूनच साताऱ्यामध्ये 17 तारखेपासून 26 जुलैपर्यंत पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. आता साताऱ्यातल्या लॉकडाऊनला नागरिक किती प्रतिसाद देतात देतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सांगलीतील स्थिती नियंत्रणात सांगली जिल्ह्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, पण कोल्हापूर आणि साताऱ्याच्या तुलनेत सांगलीची कोरोना रुग्ण संख्या आवाक्यात आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 800 कोरोना बधितांची नोंद झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शिराळा तालुका आणि मिरज कुपवाड मनपा क्षेत्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. दरम्यान, दक्षिण महाराष्ट्रातले अनेक चाकरमानी कामानिमित्त पुणे, मुंबई आणि इतर राज्यांमध्ये आहेत. लॉकडाउनच्या काळामध्ये जे चाकरमानी गावी आले होते ते पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले आहेत. पण आता या तिन्ही जिल्ह्यात आव्हान आहे ते सामूहिक संसर्ग रोखण्याचं... जरी कोल्हापूर आणि सांगलीत अजून पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली नसली तरी ती वेळ कधीही येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
First published:

Tags: Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या