मुंबई, 25 मे : देशातील कोरोनाव्हायरसची (Coronavirus) सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. त्यात राज्यातील 72 टक्के कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत (Asymptomatic). अशी माहिती इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. 72 टक्के प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं नाहीत, फक्त 23 टक्के प्रकरणांमध्येच लक्षणं दिसत असल्याची माहिती आयसीएमआरच्या सूत्रांनी दिली आहे.
सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात राज्यातील 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
हे वाचा - कोरोनाची लक्षणं असल्याशिवाय टेस्टिंगच होणार नाही, काय आहे ICMR ची नवी गाईडलाईन
सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील 5 टक्के प्रकरणं गंभीर असल्याचं आयसीएमआरच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
राज्यात आज 3041 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 50231 अशी झाली आहे. आज नवीन 1196 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 14600 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33988 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 24, 2020
महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसमुळे 1,635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 3.5 टक्के असल्याचं आयसीएमआरच्या सूत्रांनी म्हटलं आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील एकूण रुग्णांपैकी 71 टक्के रुग्णांना इतर आजार होता, असं आयसीएमआरच्या सूत्रांनी सांगितलं.
हे वाचा - कोणती शहरं कोरोनावर मात करण्यासाठी ठरली रोल मॉडेल, पाहा केंद्राचा रिपोर्ट
दुसरीकडे, देशात 24 तासांत 6977 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
संपादन - प्रिया लाड