Home /News /maharashtra /

तुटपुंज्या पगारावर Corona शी लढणाऱ्या आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ

तुटपुंज्या पगारावर Corona शी लढणाऱ्या आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ

फक्त 1600 रुपये महिना या सेविकांना मिळत आहे. त्यांचं मानधन जुलैपासून वाढणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून शासनाच्या नव्या अध्यादेशाची माहिती टोपे यांनी दिली.

    मुंबई, 25 जून :अत्यंत तुटपुंज्या मासिक पगारावर जिवाची बाजी लावून Coroanavirus च्या साथीत काम करणाऱ्या आशा सेविकांना दिलासा देणारी बातमी आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशा सेविकांचं मानधन वाढवण्याची घोषणा केली आहे. फक्त 1600 रुपये महिना या सेविकांना मिळत आहे. त्यांचं मानधन जुलैपासून वाढणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून शासनाच्या नव्या अध्यादेशाची माहिती टोपे यांनी दिली. राज्यातील सर्व आशा भगिनीच्या मानधनात 2 हजार रूपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात 3 हजार रुपये कायमस्वरूपी वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, असं आरोग्यमंत्री म्हणाले. येत्या जुलै महिन्यापासूनच त्यांना वाढीव मानधन मिळणार आहे. राज्यात कार्यरत असलेल्या 65 हजार आशाताईंसाठी आनंदाची बातमी टोपे यांनी दिली आहे. खेड्यापाड्यात जाऊन Coronavirus ची साथ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न या आशा सेविका करत आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगपासून, सर्वेक्षण, रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यापर्यंत अनेक कामं या स्वयंसेविका करतात. COVID काळात जिवाची पर्वा न करता त्या रस्त्या रस्त्यावर गावागावांतून फिरतात. कोरोनाव्हायरचं संक्रमण रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेच. शिवाय नेहमीची इतर कामं - महिला आरोग्य, प्रसूती, लसीकरण, शालेय पोषण आहारासंबंधी माहिती संकलन हेसुद्धा अविरत सुरू असतं, असा उल्लेख टोपे यांनी आशा भगिनींसाठी लिहिलेल्या पत्रात केला आहे. शरद पवार यांनी आशासेविकांच्या मागण्यांबाबत लक्ष घाला असा आग्रह धरला होता. या स्वयंसेविकांच्या मानधनवाढीसाठी 157 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करून तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो, असं या पत्रात आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आशा सेविकांचे मानधन वाढवून द्यावेत अशा मागणीचं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं. यासंदर्भात पाठपुरावाही केला होता. संकलन - अरुंधती
    First published:

    Tags: Coronavirus, Rajesh tope

    पुढील बातम्या