उस्मानाबाद, 6 मार्च : जगभरात सध्या कोरोना या आजाराणे अक्षरशः थैमान घातले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात या आजाराचा बिमोड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. मात्र असं असतानात आई तुळजाभवानी मंदिर प्रशासन मात्र या आजाराचा फैलाव होऊ नये, याबाबत बंदोबस्त करण्यासाठी उदासीन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
तुळजाभवानी मंदिरात फक्त 2 तासाला स्वछता करण्याचे आदेश देऊन मंदिर प्रशासन निवांत झाले आहे. या मंदिर परिसरात ना कुठले या आजाराच्या जनजागृतीचे बोर्ड लावले आहेत ना कुठल्याही वैद्यकीय सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसंच जे मास्क घालायचे आहेत ते देखील कुठल्याही कर्मचाऱ्याला दिले नाहीत. त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
राज्य शासनाने या आजाराचा बिमोड करावा यासाठी सगळ्या उपाययोजना करा, असे आदेश दिले असले तरी मंदिर प्रशासन सुस्त असल्याने भाविक यावर नाराज झाले आहेत. तसंच याबाबत भीतीदेखील व्यक्त करत आहेत.
दरम्यान, तुळजाभवानी देवीला केवळ राज्यातूनच नाही तर कर्नाटक, आंद्रप्रदेश या राज्यासह अनेक भागातील लोक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये येत असतात. त्यामुळे याबाबत लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंदिर व्यवस्थापक मात्र या सर्व बाबी करण्यात येतील, असे फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत काही निर्णय होतो का, हे पाहावं लागेल.
हेही वाचा-अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक
दुसरीकडे, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिरात कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. वैद्यनाथ मंदिरात दररोज परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळेच या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना तोंडाला मास्क किंवा स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश करावा, असं आवाहन मंदिर ट्रस्ट करून करण्यात आलं आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी या सूचना दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.