LIVE : लाचखोर तरुण उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड अखेर निलंबित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 30, 2021, 23:31 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  23:48 (IST)

  वाळू माफियांकडून गाडी सुरू ठेवण्यासाठी  एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव येथील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना 19 फेब्रुवारी च्या रात्री माजलगाव शासकीय निवासस्थानी  रंगेहाथ पकडले होते.या हे प्रकरण सुरू असताना  शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे.माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच मागितली होती त्यात 65 हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाणे कारवाई केली होती यामुळे जिल्ह्यात महसुल विभागात चांगलीच खळबळ उडाली होती.आज निलंबनाची कारवाई केल्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

  23:3 (IST)

  अखेर मनमाड शहरात ऑक्सिजनयुक्त डीसीएचसी कोविड सेंटर आणि दुसरे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी पूर्ण झाली असून पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने रेल्वेचे हॉस्पिटल आणि कम्युनिटी हॉल ताब्यात घेतले आहे.रेल्वे हॉस्पिटलमध्ये 25 बेडचे ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर तर तर गर्डर शॉप मध्ये असलेले कम्युनिटी हॉल मध्ये 100 बेडचे दुसरे कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी युद्ध पातळीवर केली जात असून लवकर दोन्ही सेंटर रुग्णासाठी उपलब्ध होणार माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.जी.एस.नरवणे,पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार मुंढे यांनी दिली.

  22:9 (IST)

  'औरंगाबादमधील लॉकडाऊन केला रद्द'
  जिल्हाधिकारी सुनील चव्हाणांची माहिती
  उद्यापासून सुरू होणार होतं लॉकडाऊन
  शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन रद्द
  'नवीन आदेशापर्यंत लॉकडाऊन स्थगित'
  औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

  21:59 (IST)

  शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट
  पोटदुखीच्या त्रासामुळे होणार शस्त्रक्रिया
  पवारांवर शस्त्रक्रिया आजच होणार - भुजबळ
  शरद पवारांची तब्येत ठीक आहे - भुजबळ

  21:58 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात विक्रमी रुग्णसंख्या
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3532 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 23 बळी
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2641 कोरोनामुक्त

  20:37 (IST)

  राज्यात दिवसभरात 27,918 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 23,820 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 139 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 3 लाख 40,542 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:27 (IST)

  परमबीर सिंगांच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती
  पत्राद्वारे केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती
  चांदीवाल यांच्या नेतृत्वात समितीची स्थापना
  निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल करणार चौकशी
  6 महिन्यांत समिती अहवाल सादर करणार

  20:0 (IST)

  पुणे - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मनपा कार्यालयात सामान्य नागरिकांना येण्यास प्रतिबंध, फक्त पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच पालिकेत प्रवेश, अत्यावश्यक काम असेल तरच एन्ट्री, इतरांनी मेलद्वारे तक्रारी पाठवाव्यात, पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात 'नो एन्ट्री'चा आदेश लागू असणार, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमारांचे आदेश

  19:59 (IST)

  बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन, सर्वांना अभिमान वाटेल असं स्मारक करण्याचा राज्य शासनाचा निर्धार - उद्योगमंत्री सुभाष देसाई

  19:58 (IST)

  मुंबईत दिवसभरात 4758 कोरोनाचे नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स