LIVE : गेल्या 10 दिवसात नागपूरात तब्बल 800 जणांचा मृत्यू; आजही कोरोनाबाधित रुग्णसंख्या 6 हजारांच्या जवळ

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 26, 2021, 18:57 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:51 (IST)

  परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, अकोल्याच्या पोलीस निरीक्षकानं परमबीर सिंगांवर केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं पत्र

  21:29 (IST)

  राज्य सरकार करणार रुग्णालयांचं विद्युत निरीक्षण
  विजेचे अपघात टाळण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे आदेश
  'रुग्णालयातील विद्युतसंच मांडणीचं निरीक्षण करा'
  अहवाल सादर करा - ऊर्जामंत्री नितीन राऊत

  20:43 (IST)

  महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी
  महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या घटली
  राज्यात दिवसभरात 48,700 नवीन रुग्ण
  दिवसभरात 71 हजार 736 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 524 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 82.92, मृत्युदर 1.5%
  राज्यात सध्या 6 लाख 74,770 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:33 (IST)

  राज्यात गेल्या 6 दिवसांत 4 लाख 42 हजार रुग्ण कोरोनामुक्त, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

  20:2 (IST)

  मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
  कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या निम्म्यावर
  मुंबईत दिवसभरात 3876 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत दिवसभरात 9150 कोरोनामुक्त

  19:39 (IST)

  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात विक्रमी कामगिरी
  एकाच दिवशी 5 लाखांहून अधिक जणांना लस
  महाराष्ट्र लवकरच गाठणार दीड कोटीचा टप्पा

  19:34 (IST)

  सुजय विखेंवर कारवाई करण्यासंदर्भात हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून प्रशासनाला मुभा, परवानगी नसताना 10 हजार रेमडेसिवीरचं वाटप, इंजेक्शन ताब्यात घेऊन गरजूंना वाटप करा - कोर्ट

  19:31 (IST)

  कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार
  जोरदार गारपिटीसह जोरदार पावसाची हजेरी
  कागल तालुक्यात जोरदार गारपीट
  चंदगड, भुदरगड तालुक्यात काही ठिकाणी गारपीट
  कोल्हापूरच्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित

  18:16 (IST)

  कोस्टल रोडच्या कामाची प्रगती, मान्सूनपूर्व कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

  18:15 (IST)

  ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल दुर्घटना प्रकरण, 4 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी नेमली समिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स