liveLIVE NOW

LIVE : पुण्यात 6 हजार 'रेमडीसीवीर'चा साठा प्राप्त, कोविड रुग्णालयांना पोहोचवणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 12, 2021, 19:58 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 9 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  23:58 (IST)

  पोहरादेवी येथील रामनवमी उत्सवावर कोरोनाचे सावट

  वाशिम  लाखो बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा 21 एप्रिल रोजी होणारी पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे.

  23:53 (IST)

  अकोल्यात लॉकडाउन नियमाचे उल्‍लंघन करणा-या आणि मास्‍क न लावणा-यांवर अकोला महापालिकेची 23900/- रूपयांची दंडात्‍मक कारवाई

  अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना रुग्‍णांच्‍या संख्‍येत होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे अकोला जिल्‍ह्यात लॉकडाउन लावण्‍यात आले आहे.  शासनाने लावलेल्या लॉक डाउन नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज अकोला महानगरपालिका अंतर्गत पुर्व झोन, पश्चिम झोन, उत्‍तर झोन, दक्षिण झोन आणि विशेष पथकाव्‍दारे मास्‍क न घालणा-या एकुण 66 नागरिकांवर रू. 14400/- ची आणि लॉकडाउन नियमाचे उल्‍लंघन करणा-या एकुण 9 व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांवर रू.9000/- ची तसेच सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन करणा-या 1 व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानावर रू. 500/- असे एकुण 23900/- रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

  23:49 (IST)

  जलपर्णी काढण्यासाठी तरुणी तरुणी उतरले नदीपत्रात, पिंपरी चिंचवड महापालिकेचा ढिसाळ कारभार आला चव्हाट्यावर

  नदी पात्रात साठलेली जलपर्णी काढण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील रयत विद्यार्थी परिषदेच्या  तरुण-तरुणीने पुढाकार घेत जलपर्णी काढायला सुरुवात केली आहे.
  हाच प्रकार शहरातील  रावेत  भागातही बघायला मिळाला, महापालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही जलपर्णी काढली जात नसल्याने रावेत आणि किवळे परिसरातील नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून जलपर्णी काढलीयपिंपरी चिंचवड शहरातुन वाहणाऱ्या मुळा ,पवना आणि इंद्रायणी ह्या तीनही नद्यां पूर्णतः प्रदूषित झाल्याने त्यावर अशी कित्येक किलोमीटर जलपर्णी पसरली. ज्यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरलीच आहे शिवाय डासांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण आहेत,


  21:15 (IST)

  कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया; गुढीपाडवा व नववर्ष प्रारंभाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

  21:8 (IST)

  पुण्यात दिवसभरात 4849 नवे रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 3896 कोरोनामुक्त
  पुण्यात दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू

  21:4 (IST)

  'राज्यात कडक लॉकडाऊनची गरज'
  15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल - कुंटे
  'साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय'
  मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा इशारा

  20:59 (IST)

  महाराष्ट्राला काहीशी दिलासा देणारी बातमी
  राज्यात दिवसभरात 51 हजार 751 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 52 हजार 312 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 81.94, मृत्युदर 1.68%
  राज्यात सध्या 5 लाख 64,746 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:27 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3588 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3928 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू

  19:58 (IST)

  पुणे जिल्ह्याला 6 हजार रेमडेसिवीरचा साठा प्राप्त
  संबंधित कोविड रुग्णालयांना मागणीनुसार देणार
  कंट्रोल रूममार्फत प्रत्येक इंजेक्शनचा हिशेब ठेवणार
  तपासणीसाठी भरारी पथकाचीही स्थापना
  पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुखांचे आदेश

  19:58 (IST)

  नाशिक महापालिकेची जम्बो भरती आणि कारवाई
  1321 जागांवर केली भरती, 721 उमेदवार रुजू
  मात्र 600 उमेदवारांनी केली टाळाटाळ
  ऑर्डर घेऊनही हजर न झाल्यानं प्रशासनाचा कठोर निर्णय
  पदनाम, मानधनात वाढ करूनही उमेदवारांची पाठ
  उमेदवारांना साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोटीस
  नाशिक पालिका आयुक्त कैलास जाधवांचे आदेश

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स