नाकाबंदी दरम्यान पकडला 3 लाख 51 हजार रूपये किंमतीचा गुटखा
वाशिम जिल्ह्यातील नागपूर - औरंगाबाद या महामार्गावर खेर्डा नजीक मुर्तीजापूर येथुन कारंजाकडे प्रतिबंधीत गुटखा घेऊन येणाऱ्या वाहनावर कारंजा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून 3 लाख 51 हजार आणि वाहन 7 लाख रुपये असा एकूण 10 लाख 51 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.