LIVE : लॉकडाऊनच्या निर्णयाची उद्या घोषणा, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 10, 2021, 19:28 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:15 (IST)

  मुंबईत दिवसभरात 9 हजार 327 रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 8474 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत 91 हजार 108 अॅक्टिव्ह रुग्ण
  मुंबईत आतापर्यंत 799 इमारती सील 

  पुण्यात दिवसभरात 4,953 नवे कोरोना रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 4,389 जणांना डिस्चार्ज​
  पुण्यात दिवसभरात 46 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  पुण्यात 50 हजार 473 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण

  नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4294 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात 3391 रुग्ण कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू
  नाशिक जिल्ह्यात अवघ्या 3 दिवसात 100 बळी
  नाशिक शहर 'हॉटस्पॉट' कायम
  शहरात 2087 नवे बाधित आणि 15 बळी
  नाशिक शहरात 1225 प्रतिबंधित क्षेत्र  

  19:54 (IST)

  महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी
  लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री
  सर्वांना थोडी कळ सोसावीच लागेल -मुख्यमंत्री
  'कडक निर्बंध आणि थोडी सूट असं जमणार नाही'
  'सर्व बेपर्वा झाले आणि ही परिस्थिती ओढवून घेतली'
  'किमान आठवडाभर कडक लॉकडाऊन लावावा'
  कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री
  '15 दिवस लॉकडाऊन करावा असं तज्ज्ञांचं मत'
  लॉकडाऊनबाबत 2 दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री
  'सर्वांनी मिळून राज्याला संकटातून बाहेर काढूया'
  'उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय'
  'मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय घ्यावा, सहकार्य करू'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य 

  19:54 (IST)

  पुण्यात कोरोना आढावा बैठक संपन्न
  अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक
  'वीकेंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद'
  'प्रकाश जावडेकरांनी सद्यस्थितीची माहिती घेतली'
  'आवश्यक तेवढ्या लसी देऊ; जावडेकरांचं आश्वासन'
  'केंद्राकडून व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड्स मिळणार'
  'ससून हॉस्पिटलमध्ये 500 बेड्स उपलब्ध होणार'
  'संरक्षण खात्याची हॉस्पिटल्सही उपलब्ध करणार'
  कोरोना संकटात राजकारण नको - अजित पवार
  'दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी मात्र तीव्रता कमी'
  कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक - अजित पवार
  पुण्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा करणार - अजित पवार
  'व्यापाऱ्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देणार'
  'पुणे मनपा, पोलीस आयुक्त व्यापाऱ्यांशी बोलणार' 

  19:53 (IST)

  मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हीसीद्वारे बैठक
  वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
  'न्यूज18 लोकमत'वर बैठकीतील प्रत्येक अपडेट्स
  राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही - मुख्यमंत्री
  लॉकडाऊनची वेळ आलेली आहे - मुख्यमंत्री
  आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे - मुख्यमंत्री
  'मधला काळ बरा, सर्व व्यवहार सुरू झाले होते'
  मात्र पुन्हा एकदा संसर्ग सुरू झालाय -मुख्यमंत्री
  आता तरुण, लहान मुलं बाधित - मुख्यमंत्री
  'सर्वांना लस देण्याची मागणी आपण करतोय'
  कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं - मुख्यमंत्री
  आपल्याला रुग्णवाढ रोखायची आहे -मुख्यमंत्री
  'वर्क फ्रॉम होम'ची पुन्हा सुरुवात करा -मुख्यमंत्री
  आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल -मुख्यमंत्री
  RT-PCR रिपोर्ट तात्काळ मिळावेत - फडणवीस
  'चाचणीनंतर रिपोर्ट तात्काळ मिळायला हवेत'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
  रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा - फडणवीस
  'खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर मिळत नाही'
  ऑक्सिजन, बेड्स उपलब्ध करा - देवेंद्र फडणवीस
  अधिकची व्यवस्था निर्माण करावी लागेल - फडणवीस
  'लोकांना आर्थिक मदत करण्याबाबत विचार करावा'
  वीजबिलांच्या संदर्भात विचार करावा -फडणवीस
  'निर्बंध लावताना लोकांचा, व्यापाऱ्यांचा विचार करा'
  'हातावर पोट असणाऱ्यांचा देखील विचार करावा'
  'लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी नियोजन करावं लागेल'
  परिस्थिती समजून निर्णय घ्यावा - देवेंद्र फडणवीस

  व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजी - प्रवीण दरेकर
  'लॉकडाऊन चालणार नाही, असे काँग्रेसचे होर्डिंग'
  एकवाक्यता होणं गरजेचं आहे - प्रवीण दरेकर
  'हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी'
  'आरोग्य विभागानं योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी'
  मानसिक दिलासा मिळणं गरजेचं - प्रवीण दरेकर
  केंद्र आणि राज्यात सुसंवाद असावा - प्रवीण दरेकर
  'निर्बंध लादताना सर्वसामान्य जनतेचा विचार करा'
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य 

  17:6 (IST)

  पुण्यातील कोरोना आढावा बैठक संपली
  अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर होते उपस्थित

  'वीकेंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद'
  केंद्राच्या 30 टीम महाराष्ट्रात - प्रकाश जावडेकर
  'कालपर्यंत महाराष्ट्राला एक कोटी 10 लाख डोस'
  'पुणेकरांचा संचारबंदीला चांगला प्रतिसाद'
  'प्रकाश जावडेकरांनी सद्यस्थितीची माहिती घेतली'
  'आवश्यक तेवढ्या लसी देऊ; जावडेकरांचं आश्वासन'
  'केंद्राकडून व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड्स मिळणार'
  'ससून हॉस्पिटलमध्ये 500 बेड्स उपलब्ध होणार'
  'संरक्षण खात्याची हॉस्पिटल्सही उपलब्ध करणार'
  कोरोना संकटात राजकारण नको - अजित पवार
  कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक - अजित पवार
  'कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पूर्ण नियोजन'
  उद्या व्यापारी संघटनांशी चर्चा - अजित पवार
  'व्यापाऱ्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देणार'
  'पुणे मनपा, पोलीस आयुक्त व्यापाऱ्यांशी बोलणार'
  कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर - अजित पवार
  कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय - अजित पवार 

  16:4 (IST)

  धुळ्यात आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार
  मृतदेह स्मशानात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स नाही
  तब्बल 10 तास उलटूनही अॅम्ब्युलन्स आली नाही
  अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं मृतदेह घंटागाडीतून
  साक्री तालुक्यातील सामोडेत धक्कादायक प्रकार 

  15:30 (IST)

  रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी निर्णय
  जिल्हास्तरावर कंट्रोल रूम - आरोग्य सेवा आयुक्त
  राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांच्या सूचना
  रेमडेसिवीरची मागणी वाढल्यानं जास्त किमतीत विक्री
  सध्या ऑक्सिजन कंट्रोल रूममध्ये तक्रारी स्वीकारणार
  तक्रारींचं निराकरण स्थानिक FDA कार्यालयामार्फत 

  15:30 (IST)

  पुणे शहरासाठी 2 लाख 28 हजारऐवजी 1 लाख लस
  उर्वरित 1 लाख 10 हजार लस आज मिळणार -महापौर
  'आणखी लसीचे डोस उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता'
  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्पष्ट 

  15:23 (IST)

  पुणे ब्रेकिंग :
  पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने प्रशासनासमोर आरोग्य यंत्रणेबाबत आव्हान उभं राहिलं आहे. अनेक ठिकाणी लोकांना बेडसह अन्य सुविधा मिळवताना मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणाऱ्या या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हेदखील सहभागी होणार आहेत.

  15:7 (IST)

  'न्यूज18 लोकमत'ची EXCLUSIVE बातमी
  रेल्वेतील 2,500 वर बेड्स वापराविना पडून
  मध्य आणि पश्चिम रेल्वेचे बेड्स धूळखात
  रेल्वे डब्यांचं केलं होतं आयसोलेशन वॉर्ड
  रेल्वेतील बेड्ससाठी कोट्यवधी रुपये खर्च
  कोरोनाकाळात रेल्वे बेड्सचा वापर का नाही? 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स