पोलीस दलात कोरोनाचा धोका वाढला, गेल्या 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी आली समोर

पोलीस दलात कोरोनाचा धोका वाढला, गेल्या 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी आली समोर

आतापर्यंत एकूण 25 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर 970 पोलिसांनी करोनावर मात केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 116 पोलीस करोनाबाधित झाले आहेत. तर 3 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 211 पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात 249 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 962 पोलीस कर्मचारी करोना संक्रमित आहेत.

आतापर्यंत एकूण 25 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर 970 पोलिसांनी करोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. पण महाराष्ट्रात Coronavirus चा संसर्ग सुरू झाला, त्या वेळी कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक होतं. सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात होता. आता दररोज येणाऱ्या आकडेवारीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असलेली दिसली, तरी मृत्यूदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.

पुण्यातील अक्षय बोऱ्हाडे प्रकरणाला नवं वळण, FB व्हिडिओनंतर उमटले राजकीय पडसाद

व्हेंटिलेटरवर ठेवावे लागणारे रुग्णही कमी होत आहेत. गुरुवारी दिवसभरात 698 रुग्णांना बरं झाल्याने घरी सोडण्यात आलं. गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 18616 रुग्ण आजारावर मात करत घरी गेले आहेत. म्हणजेच Covid-19 हा जीवघेणा आजार नाही, हे आता महाराष्ट्र सिद्ध करत आहे.

मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2598 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 85 कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा विषाणू राज्यभर पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2598 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 85 कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा विषाणू राज्यभर पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे.

भारतात कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड, 24 तासांत नव्या रुग्णांचा कहर

मृत्यूदर झाला कमी

राज्यात मृत्यूदर सुरुवातीला 4 टक्क्यांपेक्षा जास्त होता. तो आता 3.32 टक्क्यांवर आला आहे. आजारातून बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढल्याने रिकव्हरी रेटही वाढून 31.26 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात काही भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता, या तारखेपर्यंत होणार मान्सूचं आगमन

संपादन - रेणुका धायबर

First published: May 29, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या