75-80% रिकव्हरी रेट; महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोनावर भारी पडतंय 'नागपूर मॉडेल'

75-80% रिकव्हरी रेट; महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोनावर भारी पडतंय 'नागपूर मॉडेल'

नागपुरात (Nagpur) एकूण 406 कोरोना रुग्णांपैकी (corona patient) 313 रुग्ण बरे झालेत.

  • Share this:

नागपूर, 26 मे : महाराष्ट्रात (maharashtra) मुंबई, पुण्यानंतर नागपुरात कोरोनाव्हायरसने (nagpur coronavirus) पाय रोवले. मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतेच आहे. मात्र नागपूर कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसतं आहे. नागपुरात 75 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झालेत. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

नागपुरात कोरोनाचे एकूण 406 रुग्ण आहेत. त्यापैकी 313 रुग्ण बरे झालेत. याचा अर्थ नागपुरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 75-80 टक्के आहे. कोरोनाव्हायसरवर मात करण्यात नागपूर यशस्वी  होताना दिसतं आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात नागपूर मॉडेल कोरोनाविरोधात भारी पडताना दिसतं आहे. नागपूरने कोरोनाविरोधी लढ्यासाठी योजनाबद्ध रणनीती आखली आहे आणि याच रणनीतीनुसार लढा लढत असल्याने नागपूर कोरोनाला चांगलंच थोपवत आहे.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं, "नागपुरात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 75-80 टक्के आहे. याला कारण आहे ते म्हणजे आयडंटिफिकेशन, ट्रेसिंग, आयसोलेशन, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट. याच रणनीतीनुसार आम्ही काम करत आहोत"

हे वाचा - 14 दिवसात देशात 70 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी आली एक दिलासादायक बातमी

भारतात कोरोनाव्हायरसची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी जवळपास 40 टक्के कोरोना रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत.

मंगळवारी देशात कोरोनाव्हायरसमुळेमृत्यूची संख्या 4167 वर पोहोचली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 80722 पर्यंत पोहोचली आहे, तर बरे झालेल्या लोकांची संख्या 60490 वर पोहचली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 24 तासांत 6,535 प्रकरणे वाढली. त्याचवेळी एका दिवसात 146 लोक मरण पावले. यासह, गेल्या 24 तासांत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 2,770 आहे. मंगळवारपर्यंत देशभरात एकूण कोरोनाची प्रकरणे 145,380 वर पोहोचली आहेत.

हे वाचा - 'या' देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता रुग्णालयात राहिला फक्त एक कोरोना

कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

First published: May 26, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading