Home /News /maharashtra /

मोठा दिलासा! 2 दिवसात राज्यात 700 कोरोनारुग्ण झाले बरे; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मोठा दिलासा! 2 दिवसात राज्यात 700 कोरोनारुग्ण झाले बरे; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही दिलासादायक बातमी दिली आहे.

    मुंबई, 6 मे : राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे 700  रुग्णांना घरी सोडण्यात आलंआहे. एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (4 मे) आणि मंगळवारी (5 मे) अनुक्रमे 350 आणि 354  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंत सुमारे सव्वा महिन्यात 2819 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 2 महिन्यांपूर्वी सापडला होता पहिला रुग्ण राज्यात 9 मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर 25 मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आलं. पहिले दोन रुग्ण पुण्यातलेच होते. त्यानंतर दररोज राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी 4 मे रोजी पहिल्यांदाच 350 रुग्णांना तर लगेच दुसऱ्या दिवशी 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक! 44 पैकी 28 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली. राज्यात सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळात आहेत. आतापर्यंत मुंबई परिसरात 460 रुग्ण गेल्या दोन दिवसात घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 213 रुग्णांना पाठविण्यात आले, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अर्थात रुग्णवाढीचा दरही याच दोन शहरांमध्ये सर्वाधिक आहे. 27 मार्चला 24, 29 मार्चला 35, 30 मार्चला 39, 3 एप्रिलला 50, 7 एप्रिलला 79, 8 एप्रिलला 117, 11 एप्रिलला 208, 1 मे रोजी 106, 4 मे रोजी 350, 5 मे रोजी 354 रुग्णांना दररोज घरी सोडण्यात आले. अन्य बातम्या रियाझ नायकूसाठी होतं 12 लाखाचं इनाम; पकडण्यासाठी असा रचला सापळा दुधाची तहान ताकावर...कोरोना लॉकडाऊनमुळे दारू मिळेना, मग लोकांनी काय केलं पाहा कोरोनामुळे नोकऱ्यांवर गदा, 'या' कंपनीने 1900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या