राज्यात कोरोना कहर; आज 14000 पेक्षाही अधिक रुग्ण
महाराष्ट्रातला कोरोना कहर वाढतोच आहे. राज्यात लॉकडाउनबद्दल दोन दिवसात निर्णय घेणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं आहे.
नागपूरमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
आता कुणीही कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करताना दिसलं तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आज राज्यात 14317 नवे रुग्ण सापडले. 7193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण २१,०६,४०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.९४% एवढे झाले आहे.
• आज राज्यात १४,३१७ नवीन रुग्णांचे निदान.
• राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.३२ % एवढा आहे.
• आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७२,१३,३१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,६६,३७४ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
• सध्या राज्यात ४,८०,०८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण १,०६,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.