राज्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण लाखाच्या वर; बरे झालेल्यांची संख्याही दीड लाखांजवळ

राज्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण लाखाच्या वर; बरे झालेल्यांची संख्याही दीड लाखांजवळ

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6497 रुग्णांची भर त्यात पडली. तर 193 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 4182 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,60,924 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 10,482 वर गेला आहे.

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही , हा त्यातल्या त्यात दिलासा म्हणावा लागेल. आतापर्यंत महाराष्ट्रात अडीच लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,44,507 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबई आणि पुणे जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते आहे.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

मुंबई 22900

ठाणे 34430

पुणे 22196

पालघर 4917

रायगड 4525

मुंबईतील Coronavirus ची साथ आटोक्यात आली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठल्याने ते सिद्ध झाले आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, अशी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 22 जून 2020 रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवस होता. हा कालावधी 2 ते 3 आठवड्यांत 50 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोषित केले होते. तसेच त्यादृष्टीने प्रशासनाने निश्चित केलेल्या आराखड्याची माहितीदेखील दिली होती. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1 जुलै 2020 रोजी 42 दिवसांवर पोहोचला. तर आज (दिनांक 13 जुलै 2020) हा कालावधी 51 दिवसांचा आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन आणि विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे. .आता राज्यातही मुंबईचा पॅटर्न राबवण्याी गरज व्यक्त होत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 13, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading