महाराष्ट्रात कोरोना कहर! दर तासाला 1000 नव्या रुग्णांची भर, पाहा लेटेस्ट आकडे

महाराष्ट्रात कोरोना कहर! दर तासाला 1000 नव्या रुग्णांची भर, पाहा लेटेस्ट आकडे

गेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : Coronavirus ची साथ महाराष्ट्रात भीषण स्वरूप धारण करते आहे. दररोज रुग्णसंख्येचा नवा उच्चांक समोर येतो आहे. गेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. राज्यभरात सध्या 2,52,734 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत.

पुण्यात सर्वाधिक

पुणे जिल्ह्यात सध्या Covid-19 चे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात पुण्याचा आकडा अव्वल आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे. पुण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात कोरोना प्रकोप वाढतो आहे.

मुंबई महानगर भागात गेल्या 24 तासांत 2227 रुग्ण दाखल झाले आहे. तर पुण्यात 2340 रुग्ण दिवसभरात सावपडले.

ठाणे होतंय कोरोनाचा हॉटस्पॉट

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे. ठाणे शहरात 495, नवी मुंबईत 391, तर कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासांत तब्बल 785 रुग्ण सापडले आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर धोक्यात

सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा कळस गाठला जात आहे. गेले काही दिवस 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण राज्यात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या पश्चिम महाराष्ट्र आणि नागपुरात सर्वाधिक आहे.

गेल्या 24 तासांत 13,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 6,86,462 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर पहिल्यांदाच तीनच्या खाली आला आहे. आता महाराष्ट्रात Covid मृत्यूदर 2.87 टक्के एवढा आहे.

राज्यात 16,11,280 रुग्ण घरात विलगीकरणामध्ये (Home quarantine) आहेत. 37,644 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाखांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार, आता राज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या 967349 आहे. तर मृत्यूचा आकडा 27787 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 2,52,734 रुग्ण आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा वेग पन्हा एकदा वाढतो आहे. उलट नाशिक, औरंगाबादेत तो थोडा कमी झाला आहे. पण जळगावमध्ये रुग्णसंख्या वाढ कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत कोरोना झपाट्याने वाढतो आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा कहर झाला आहे.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

पुणे 65361

ठाणे 27576

मुंबई 25665

नागपूर 18322

नाशिक 10827

कोल्हापूर 10195

सांगली 8356

जळगाव 7709

सातारा 7905

औरंगाबाद 6490

8 सप्टेंबरची आकडेवारी

अॅक्टिव्ह रुग्ण - 2,52,734

24 तासांतली वाढ -23,816

बरे झालेले रुग्ण - 6,86,462

एकूण मृत्यू - 27787

एकूण रुग्ण - 9,67,349

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 9, 2020, 10:28 PM IST

ताज्या बातम्या