Home /News /maharashtra /

Coronavirus राज्याची स्थिती भीषण; 3 जिल्ह्यातच आहेत सव्वा लाख अॅक्टिव्ह पेशंट्स, पाहा ताजी आकडेवारी

Coronavirus राज्याची स्थिती भीषण; 3 जिल्ह्यातच आहेत सव्वा लाख अॅक्टिव्ह पेशंट्स, पाहा ताजी आकडेवारी

Coronavirus च्या साथीत मृत्युदर कमी होत असला, तरी संसर्गाचा धोका वाढतो आहे. 24 तासांत 20,131 नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबईसह 3 जिल्ह्यांत संसर्ग वाढतो आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातही Covid चा धोका वाढला आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : Coronavirus ची साथ महाराष्ट्रात भीषण स्वरूप धारण करते आहे. दररोज रुग्णसंख्येचा नवा उच्चांक समोर येतो आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांवर नवे रुग्ण सापडले, तर 380 रुग्णांचा Covid-19  मुळे  मृत्यू झाला. आटोक्यात आली असं वाटत असतानाच मुंबईतही कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यभरात सध्या 2,43,446 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले लाखांवर उपचाराधीन रुग्ण फक्त पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर धोक्यात सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा कळस गाठला जात आहे. गेले काही दिवस 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण राज्यात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate)  वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या पश्चिम महाराष्ट्र आणि नागपुरा सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत 13,234 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 6,72,556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर पहिल्यांदाच तीनच्या खाली आला आहे. आता महाराष्ट्रात Covid मृत्यूदर 2.90 टक्के एवढा आहे. राज्यात 15,57,305 रुग्ण घरात विलगीकरणामध्ये (Home quarantine) आहेत. 38,141 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. ही वाढती संख्याही भीती वाढवणारी आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाखांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार, आता राज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या 943772 आहे. तर मृत्यूचा आकडा 27407 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 2,43,446 रुग्ण आहेत. एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा वेग पन्हा एकदा वाढतो आहे. उलट नाशिक, औरंगाबादेत तो थोडा कमी झाला आहे. पण जळगावमध्ये रुग्णसंख्या वाढ कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत कोरोना झपाट्याने वाढतो आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा कहर झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार पुणे 62859 ठाणे 25852 मुंबई 24560 नागपूर 17269 नाशिक 10400 कोल्हापूर 9555 सांगली 8678 जळगाव 8095 सातारा 7905 औरंगाबाद 6490 8 सप्टेंबरची आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्ण - 2,43,446 24 तासांतली वाढ - 20,131 बरे झालेले रुग्ण - 6,72,556 एकूण मृत्यू - 27407 एकूण रुग्ण - 9,43,772
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या