पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण; Coronavirus ची महाराष्ट्रातली ताजी आकडेवारी

पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण; Coronavirus ची महाराष्ट्रातली ताजी आकडेवारी

पुण्या-मुंबईनंतर नाशिक आणि नागपूर जिल्हे महाराष्ट्रातले Coronavirus hot spots झाले आहेत. पाहा गेल्या 24 तासांची ताजी आकडेवारी

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : ऑगस्ट महिना संपला, तरी Coronavirus चा राज्यातला कहर कमी होण्याचं नाव घेत नाही. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण गेल्या काही दिवसांपेक्षा गेल्या 24 तासांत कमी झालेलं असलं, तरी अद्याप राज्याला कोरोनाच्या कचाट्यातून सुटकारा मिळालेला नाही. राज्यातली एकूण Covid-19 रुग्णसंख्या 8 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. Unlock नंतर आता E pass सुद्धा रद्द झाल्याची बातमी आल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा Covid रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते.

राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 11,852 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही 11,158 आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत असलेल्या पुणे, मुंबई आणि ठाण्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढते आहे. शिवाय नागपूर, नाशिकमध्येही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच आकडी झाल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 7,92,541 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.37 टक्के एवढे झालेलं आहे. राज्यात आज 184 रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला असून राज्यातील मृत्यूदर 3.1 टक्के एवढा आहे.

राज्यात 13,55,330 व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत, तर 35,722 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण मध्ये आहेत.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 7,92,541 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 24,583 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,94,056 रुग्ण आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पावणेदोन लाख पुणेकरांना आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. पुणे जिल्ह्यात 52712 रुग्ण अजूनही उपचाराधीन आहेत. मुंबई, ठाण्यातही कमी होत असलेली रुग्णवाढ वाढू लागली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

पुणे 52712

ठाणे 21375

मुंबई 20551

नागपूर 11701

नाशिक 11614

जळगाव 7382

कोल्हापूर 6782

पालघर 6689

31 ऑगस्टची आकडेवारी

अॅक्टिव्ह रुग्ण - 1,94,056

24 तासांतली वाढ - 11,852

बरे झालेले रुग्ण - 5,73,559

एकूण मृत्यू - 24583

एकूण रुग्ण - 7,92,541

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 31, 2020, 9:32 PM IST

ताज्या बातम्या