Coronavirus 24 तासांत 14 हजारांवर रुग्ण झाले बरे, पण संख्या गेली 7 लाखांजवळ; आलेख अजूनही सपाट नाहीच

Coronavirus 24 तासांत 14 हजारांवर रुग्ण झाले बरे, पण संख्या गेली 7 लाखांजवळ; आलेख अजूनही सपाट नाहीच

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होते, त्या वेळी Covid साथीचा आलेख सपाट झाला आणि साथ आटोक्यात आली असं म्हणता येतं. पण महाराष्ट्रात नवे रुग्ण अजूनही वाढत आहेत. आता तर संख्या 7 लाखांजवळ पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : Coronavirus चे नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी होऊन, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होते, त्या वेळी Covid साथीचा आलेख सपाट झाला आणि साथ आटोक्यात आली असं म्हणता येतं. पण महाराष्ट्रात अजूनही हा आलेख चढाच आहे. Corona रुग्णांची संख्या 7 लाखांजवळ पोहोचली तरी धोका अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा 11,015 नव्या Covid positive रुग्णांंची भर पडली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 14,219 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. याचा अर्थ नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनी अधिक आली आहे. ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब असली, तरीही कोरोनाचा आलेख अजूनही सपाट झालेला नाही.

राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,93,398 झाली आहे. यातले 5,02,49 जण बरे झालेले आहेत. मृत्यूचा आकडा 22465 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,68,126 रुग्ण आहेत. ही अॅक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.

गेले काही दिवस सलग 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल होत होते. त्यामुळे राज्याच्या Covid-19 च्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,68,126 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर कायम आहे आणि हा विषाणू आता गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. पुणे जिल्ह्यात अजूनही सर्वाधिक कोरोनारुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही याच जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

गेल्या 24 तासांत 14,219रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आज 212 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.24 टक्के एवढा आहे.

राज्यात 12,44,024 रुग्ण घरात विलगीकरणामध्ये (Home quarantine) आहेत. 33,922 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.24 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे.

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. औरंगाबादमधले अॅक्टिव्ह पेशंटही कमी होत आहेत. उलट नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांतली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसते आहे.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

पुणे 43065

ठाणे 19335

मुंबई 18267

नाशिक 10486

नागपूर 8769

कोल्हापूर 6900

जळगाव 6554

24 ऑगस्टची आकडेवारी

अॅक्टिव्ह रुग्ण - 1,68,126

24 तासांतली वाढ - 11,015

बरे झालेले रुग्ण - 5,02,490

एकूण मृत्यू - 22465

एकूण रुग्ण - 6,93,398

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 24, 2020, 8:12 PM IST

ताज्या बातम्या