Home /News /maharashtra /

Coronavirus चा कहर! 24 तासांत 14 हजारांवर रुग्ण; मुंबई, पुण्याबाहेर या जिल्ह्यांत धोका वाढला

Coronavirus चा कहर! 24 तासांत 14 हजारांवर रुग्ण; मुंबई, पुण्याबाहेर या जिल्ह्यांत धोका वाढला

 त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 14,492 नवे (Covid-19) कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या वाढत असल्याने खरी काळजी आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट : Coronavirus च्या रुग्णांमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकी वाढ झाली आहे. 14 हजारांवर नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत. त्यामुले राज्याच्या Covid-19 च्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,62,491 एवढी झाली आहे. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू होत असतानाच ही विक्रमी रुग्णवाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत 14,492 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate)  वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या वाढत असल्याने खरी काळजी आहे. गेल्या 24 तासांत 12,243 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 4,59,124 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज 326 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.32 टक्के एवढा आहे. राज्यात 11,76,261 रुग्ण घरात विलगीकरणामध्ये (Home quarantine) आहेत. 37,639 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 6,43,289 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 21359 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,60,413 रुग्ण आहेत. एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.35 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. उलट नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांतली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसते आहे. जळगावात मृत्यूदरसुद्धा अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार पुणे 40962 ठाणे 20133 मुंबई 18172 नाशिक 10576 नागपूर 8428 कोल्हापूर 6748 औरंगाबाद 6490 जळगाव 5532 20 ऑगस्टची आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्ण - 1,62,491 24 तासांतली वाढ - 14,492 बरे झालेले रुग्ण - 4,59,124 एकूण मृत्यू -21359 एकूण रुग्ण - 6,43,289
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या