बुधवारी पुण्यात 3 हजार 581 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात coronavirus चे hot spots ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातली नवीन रुग्णसंख्या सातत्याने खाली येत असल्याने दिलासादायक चित्र दिसत आहे. पण ताज्या आकडेवारीवरून काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाचा धोका वाढताना दिसतो. वाचा सविस्तर
मुंबई, 6 ऑक्टोबर : महाराष्ट्रात coronavirus चे hot spots ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातली नवीन रुग्णसंख्या सातत्याने खाली येत असल्याने दिलासादायक चित्र दिसत आहे. पण मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या दैनंदिन Covid-19 आकडेवारीवरून काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाचा धोका वाढताना दिसतो. विशेषतः ग्रामीण भागात या विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचं दिसतं. 6 ऑक्टोबरला राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, राज्यात 2,47,023 कोरोना रुग्ण उपचाराधीन (Active patients)आहेत. गेल्या 24 तासांत 12,258 नवे रुग्ण राज्यात सापडले, तर 370 जणांचं Covid मुळे निधन झालं.
गेल्या 24 तासांत 17,141 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा बऱ्याच दिवसांनी अडीच लाखांच्या खाली आला आहे. तरीही ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड अशीच आहे. राज्यात सध्या 22,38,351 एवढे लोक होम क्वारंटाइन अर्थात घरातच अलगीकरणात आहेत. तर 25,828 एवढे रुग्ण संस्थात्मक विलगीकरण म्हणजेच institutional quarantine मध्ये आहेत.
कुठल्या जिल्ह्यांत धोका वाढला?
दैनंदिन नव्या रुग्णसंख्येत पुणे, नागपूर आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये घट झाली आहे. पुणे शहर आणि मुंबई महानगरातही दैनंदिन रुग्णवाढीचा वेग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. पण त्याच वेळी ठाणे जिल्ह्यातली रुग्णवाढ कायम आहे. त्यात थोडी घट असली, तरी अद्याप परिस्थिती पूर्ण आटोक्यात असल्याचं दिसत नाही. खरी वाढ दिसते आहे ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात.
नगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक झालेला दिसतो. नागपूरमध्ये रुग्णवाढ कायम असली, तरी वेग कमी झाल्याचं दिसतं.
जिल्हानिहाय अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी
पुणे - 58868
ठाणे -31009
मुंबई - 26003
नाशिक - 13552
नागपूर - 10964
औरंगाबाद - 10025
सातारा - 8776
6 ऑक्टोबरची आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी
अॅक्टिव्ह रुग्ण - 2,47,023
24 तासांतली वाढ - 12,258
24 तासांतले मृत्यू - 370
एकूण रुग्णसंख्या - 1465911
एकूण मृत्यू - 38717
मृत्यूदर - 2.64%
रिकव्हरी रेट - 80.48%
देशातल्या सरासरी मृत्यूदरापेक्षा राज्यातला मृत्यूदर अद्यापही जास्त आहे. देशात आणि अन्य राज्यांमध्येही Covid मृत्यूंचं प्रमाण कमी राहिलं आहे. महाराष्ट्रात अद्यापही मृत्यूदर अडीच टक्क्यांहून अधिक आहे.
केंद्राच्या आरोग्य विभागाकडून इशारा
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या जिल्ह्यांबाबत माहिती दिली. सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या 25 जिल्ह्यांपैकी 15 जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत. म्हणजे देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेल्या जिल्ह्यांपैकी निम्म्याहून अधिक जिल्हे महाराष्ट्रातील आहेत आणि ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.