Home /News /maharashtra /

राज्यातले उपचाराधीन रुग्ण झाले कमी; पण 24 तासांत 481 जणांचा झाला Covid मुळे मृत्यू

राज्यातले उपचाराधीन रुग्ण झाले कमी; पण 24 तासांत 481 जणांचा झाला Covid मुळे मृत्यू

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी रविवारी मोठी घोषणा केली.

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी रविवारी मोठी घोषणा केली.

गेल्या काही महिन्यातली Covid ची सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा दोन दिवसांत वाढ झाली आहे. पाहा आजचे लेटेस्ट आकडे

    मुंबई, 29 सप्टेंबर : महाराष्ट्रात Coronavius च्या नवीन रुग्णांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसात थोडी कमी येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पण Covid-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत 481 जणांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा दोन दिवसांत वाढ झाली आहे. दिवसभरात 19,163 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर 18,317 नवीन रुग्ण दाखल झाले. राज्यात आतापर्यंत 10,88,322 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण अद्याप  2,59,033 रुग्ण उपचाराधीन आहेत. उपचाराधीन रुग्णांची (Active patients) सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे, त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा क्रमांक आहे.  दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत गेल्या काही दिवसांत नवीन रुग्ण सापडण्याचा वेग तुलनेने कमी झाला आहे. त्या मानाने डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा रुग्णवाढीचा दर आटोक्यात ठेवण्यात यश आलं आहे. 30 सप्टेंबरची आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्ण  - 2,59,033 24  तासांतली वाढ - 18,317 24 तासांतले मृत्यू - 481 एकूण रुग्णसंख्या - 1384446 एकूण मृत्यू - 36662 मृत्यूदर - 2.65% रिकव्हरी रेट - 78.61% देशातल्या सरासरी मृत्यूदरापेक्षा राज्यातला मृत्यूदर अद्यापही जास्त आहे. देशात आणि अन्य राज्यांमध्येही Covid मृत्यूंचं प्रमाण कमी राहिलं आहे. महाराष्ट्रात अद्यापही मृत्यूदर अडीच टक्क्यांहून अधिक आहे. आकडेवारीमागचं भीषण वास्तव गेल्या आठवड्याच News18 ने दिलेल्या विश्लेषणानुसार, भारतात होणारे अनेक मृत्यू हे घरी होत असतात. रुग्णालयात दाखल करेपर्यंतची व्यवस्थाच नसल्याने उपचारांअभावीच हे मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदले जातात. त्यामुळे अशा रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येत नसून अशा अनेक रुग्णांच्या मृत्यूची नोंद देखील होत नाही. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांची आरोग्य मंत्रालयाच्या मेडिकल सर्टिफिकेट विभागाकडे नोंद नसल्याने या ठिकाणी होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांची नोंदच घेतली जात नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मृत्यूंची नोंद होत नसून दिल्लीमध्ये केवळ 63 टक्के रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचीच नोंद होत असते. त्यामुळे आपण विचार करू शकतो की, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांसारख्या अविकसित राज्यांमध्ये काय परिस्थिती होत असेल. या ठिकाणी केवळ 35 टक्के रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद होत नसल्यामुळे खरा डेटा समोर येत नाही. कोरोनच्या सर्व मृत रुग्णांची नोंद नाही कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट होत नसल्यामुळे (Covid test) अनेक मृत्यू कशामुळे झाले आहेत हे समोर येत नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे की नाही हे समजत नाही. अशा संदिग्ध अवस्थेतल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असू शकतो. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर जेवढा कमी असल्याचं दाखवलं जातं, तेवढा तो खराच कमी आहे का याचा कोणताही ठोस पुरावा भारताच्या आरोग्य विभागाकडे नाही. भारतात सध्या कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र भारताची लोकसंख्या लक्षात घेता होणाऱ्या चाचण्या अजूनही फार कमी आहेत. या आकडेवारीचा विचार केला तर, दरदिवशी केवळ 10 लाख नागरिकांमागे केवळ एकाच व्यक्तीची टेस्ट केली जाते आहे. भारताशी तुलना केली तर अमेरिकेमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 150 टेस्ट तर ऑस्ट्रेलियामध्ये 156 टेस्ट करण्यात येत आहे. जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित आढळला आणि जर त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असल्यास (Comorbidity) तर त्याच्या मृत्यूची नोंद कोरोनाने झाल्याची होत नाही. त्यामुळे देखील त मृत्यूदर कमी असल्याचे दिसून येत आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या