मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाचे राज्यात 117 नवे रुग्ण, संख्या 1135 वर; आजचे 9 महत्त्वाचे कोरोना अपडेट्स

कोरोनाचे राज्यात 117 नवे रुग्ण, संख्या 1135 वर; आजचे 9 महत्त्वाचे कोरोना अपडेट्स

दिवसभरात राज्यात आणि देशात कोरोनाव्हायरसच्या साथीची परिस्थिती काय होती, पाहा एका क्लिकवर

दिवसभरात राज्यात आणि देशात कोरोनाव्हायरसच्या साथीची परिस्थिती काय होती, पाहा एका क्लिकवर

दिवसभरात राज्यात आणि देशात कोरोनाव्हायरसच्या साथीची परिस्थिती काय होती, पाहा एका क्लिकवर

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 8 एप्रिल : राज्यात आज 117 नवीन कोरोनारुग्ण दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1135 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 72 जणांचा Coronavirus मुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरातले कोरोनाव्हायरस साथीसंदर्भातले अपडेट्स. या बातम्या रात्री 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकड्यांवर आणि माहितीवर आधारित आहेत. 1. मुंबई हा फक्त राज्याचाच नाही तर देशाचा कोरोना हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत आज कोरोनाचे 106 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 696 एवढी झालीय. तर 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 45 झाली आहे. 2. पुण्यात Coronavirus  चं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पुण्यात दुपारपर्यंत 5 मृत्यूंची नोंद झाली होती. आणखी 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी आता आली आहे. त्यामुळे दिवसभरात पुण्यात कोरोनाचे 8 बळी गेले. हा आतापर्यंतचा मोठा आणि चिंता वाढवणारा आकडा आहे. 3. बारामती शहरात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकाच  कुटुंबातील वडीलांसह, मुलगा, सून, आठ वर्षाची मुलगी आणि एक वर्षाच्या नातीला कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून आता शहरातील भाजीविक्रेते, मासळी आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 4. मुंबईबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली पूर्वेत आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोन महिलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या दोन्ही महिला एकाच कुटुंबातील आहेत. आता कल्याण- डोंबिवलीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. 5. 'आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत', असं वक्तव्य अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. कोरोनापासून दूर असलेल्या अकोल्यात मागील 24 तासांपासून दोन रुग्ण सापडल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्येही काहीसं चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात 8 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातल्या 7 जणांचे 'तबलिगी' कनेक्शन समोर येत आहे. सविस्तर इथे वाचा.

. मुंबई आणि पुण्यात घराबाहेर पडण्यासाठी आता मास्क आवश्यक आहे. मास्क नसेल तर पोलीस तुम्हाला अटकही करू शकतात असा नियमच महापालिकेने केला आहे.  हा मास्क घरी तयार केलेला असला तरी चालणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क गरजेचा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अधिक वाचा 7. रत्नागिरी जिल्ह्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला.  कोकणातला हा पहिला कोरोनाबळी आहे. हे गृहस्थ 17 मार्चला दुबईहून आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली. 8. कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा 9. पंतप्रधान मोदींनी आज सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. कोरोनाव्हायरसच्या (Covid -19) प्रकरणात वाढ होत असताना देशाच्या सर्व भागांतून  14 एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणाले की, ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवावाच लागेल.
First published:

पुढील बातम्या