Home /News /maharashtra /

एकाच दिवशी 587 रुग्ण बरे होऊन गेले घरी; रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक बातमी

एकाच दिवशी 587 रुग्ण बरे होऊन गेले घरी; रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक बातमी

राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 587 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  मुंबई, 12 मे : राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 587 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काल सोमवारी ठाणे येथील 209 रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील 161 मुंबईतल 55, रायगड येथील 53 औरंगाबाद येथील 43 अशा प्रकारे राज्यभरात 587 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज त्यात बरे होणाऱ्या 300 हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात 5000 रुग्ण बरे झाले आहेत. डॉक्टरांच्या उपचाराला आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यातील सर्वात महत्वाचा दुवा परिचारिका ठरत असून रुग्णाची  शुश्रुषा करुन त्याला बर करण्यासाठी त्या परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या लढ्यात रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा देऊन अहोरात्र झटणाऱ्या, हिमतीने लढणा-या सर्व परिरचारीकांना आरोग्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय  परिचारीका दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. 20लाख कोटींचं पॅकेज जाहीर; लॉकडाऊनध्येच मोदींनी दाखवलं स्वयंपूर्ण भारताचं स्वप्न उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील अभिनंदन केले आहे. समाजात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचं प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडलेच्या बरोबर एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी संख्येनं रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. लॉकडाऊन संपणार नाही; मोदींनी सांगितलं वेगळा असेल लॉकडाऊन 4.0 पुणे विभागातील 1359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. मुंबईतली धारावी हॉटस्पॉट मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट ठरला आहे. आज धारावीत नवे बाधित-46 रुग्ण सापडले. आता धारावीतल्या रुग्णांची संख्या 962 झाली आहे. आज तिथल्या एका रहिवाशाचा मृत्यूही झाला. एकूण 31 मृत्यू या वस्तीत झाले आहेत. दरम्यान लॉकडाऊ 4.0 ची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली असली, तरी हळूहळू सार्वजनिक वाहतूक सुरू होत असल्याचेही संकेत आहेत. जवळपास 50 दिवसांच्या दीर्घकाळानंतर केंद्र सरकारने रेल्वे सेवा सुरू केली आहे. यानंतर आता सरकार लवकरच विमानसेवा सुरू करण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदींची सर्वात मोठी घोषणा; 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे कोणाला होईल फायदा?

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या