राज्याची कोरोनासंख्या पावणेदोन लाखांजवळ; फ्रान्सपेक्षाही जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

राज्याची कोरोनासंख्या पावणेदोन लाखांजवळ; फ्रान्सपेक्षाही जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

आतापर्यंत 1,74761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. जाणून घ्या Coronavirus संदर्भातले महाराष्ट्राचे latest updates

  • Share this:

मुंबई, 24 जून : गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात Coronavirus चे नवे 4878 रुग्ण दाखल झाले. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्यासारखं वाटत असतानाच महाराष्ट्राचा एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 174761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फ्रान्ससारख्या एकेकाळच्या कोरोना हॉटस्पॉटपेक्षा जास्त रुग्ण आज फक्त राज्यातच निघाले आहेत. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 95 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 150 असे 245 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले.

गेले काही दिवस दररोज किमान पाच हजारांची रुग्णवाढ होत आहे. आज दिवसभरात 4878 रुग्ण नव्याने दाखल झाले, तर 1951 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे.

राज्यात सध्या 75,979 अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. मुंबई महानगर भागातच यातले 50 हजारहून अधिक रुग्ण आहेत. तर पुणे परिसराचा आकडा 10 हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या महानगरांसह 12 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिली.

FACT CHECK : मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण?

राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 74 हजार 761 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 75,979 आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 52.02 टक्के

मृत्यूदर - 4.49 टक्के

सध्या राज्यात 5,78,033 लोक होम क्वारंटाइन आहेत. 38,866 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 30 हून अधिक दिवसांवर गेला आहे.

संकलन - अरुंधती

First published: June 30, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading