धक्कादायक: राज्यात एका तासाला एक कोरोनाबाधिताचा मृत्यू, रुग्ण संख्याही वाढली

धक्कादायक: राज्यात एका तासाला एक कोरोनाबाधिताचा मृत्यू, रुग्ण संख्याही वाढली

राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून ती आता 1364 वर पोहोचली आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्या विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला तर 10 पुरुषांचा समावेश आहे. पुण्यातील 14, मुंबईत 9 तर मालेगाव आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा आता 97 वर पोहोचला आहे.

हेही वाचा.. #Lockdown: युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुलाने घरीच केली वडील आमदारांची कटिंग

प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 30766 नमुन्यांपैकी 28865 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत 125 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या...

मुंबई- 876

पुणे महानगरपालिका- 181

पिंपरी चिंचवड मनपा- 19

पुणे ग्रामीण- 6

ठाणे मनपा -26

कल्याण डोंबिवली मनपा- 32

नवी मुंबई मनपा-31

मीरा भाईंदर-4

वसई विरार मनपा-11

पनवेल मनपा- 6

पालघर ग्रामीण एकूण-3

सातारा-6

सांगली -26

नागपूर मनपा-19

अहमदनगर मनपा- 16

बुलढाणा-11

अहमदनगर ग्रामीण-9

औरंगाबाद मनपा-16

लातूर मनपा-8

अकोला-9

मालेगाव-5

रत्नागिकी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती मनपा प्रत्येकी-4

कोल्हापूर मनपा -5

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, जळगाव मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी-1

एकूण- 1364

हेही वाचा... कोरोनाविरुद्ध अमेरिकेला सापडली 10 औषधं? डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

देशात 24 तासांमध्ये तब्बल 549 नवे रुग्ण,

दुसरीकडे, देशात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. आता टेस्टिंग वेगाने होत असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 5734 तर मृत्यूचा आकडा 166 वर गेला आहे. 473 जणांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

अग्रवाल यांनी माहिती देतांना स्पष्ट केलं की PPE सूट, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा देशांतर्गत पुरवढा सुरू झाला आहे. देशात 20 उत्पादक PPE सूटची निर्मिती करत आहेत. 1 कोटी 7 लाख PPE सूटची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर 49 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 9, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading