सावधान! COVID संपलेला नाही; राज्यात कोरोना मृत्यूंचं प्रमाण पुन्हा वाढलं

सावधान! COVID संपलेला नाही; राज्यात कोरोना मृत्यूंचं प्रमाण पुन्हा वाढलं

गेल्या 24 तासांत 87 मृत्यू नोंदले गेले आहेत. देशात सर्वाधिक Covid-19 चे मृत्यू पुन्हा महाराष्ट्रातच होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra Corona updates) पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपेक्षा दैनंदिन नव्या रुग्णांची (Covid-19) संख्या वाढली असून कोरोना मृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या  24 तासांत 87 मृत्यू नोंदले गेले आहेत. ही गेल्या अनेक दिवसांतली मोठी मृत्यू संख्या आहे. देशात सर्वाधित कोरोना मृत्यू पुन्हा एकदा महाराष्ट्रात होऊ लागले आहेत.

शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 4,268 कोविड रुग्णांचं निदान झालं आहे.  र राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.57 टक्के एवढा झाला आहे.

ताजी कोरोना आकडेवारी

- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,15,70,137 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,72,440 (16.18 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- सध्या राज्यात 5,32,288 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,122 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्या (Active patients) 73,315 आहेत.

गेल्या महिन्यात कमी झालेली Covid रुग्णांची संख्या नोव्हेंबर मध्यापासून वाढू लागली. महाराष्ट्राचा कोरोनाचा आलेख उतरत होता, तो पुन्हा चढू  लागेल की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. लोक कोरोनाव्हायरससंदर्भातले नियम, क्वारंटाइनचे नियम, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. याच कारणाने मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचाही विचार सुरू आहे. अद्याप शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. डिसेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. कोरोनाची लस शेवटच्या टप्प्यात आलेली असली, तरी लशीचं उत्पादन लक्षात घेता ती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान वर्ष- दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेत कोरोनाला दूर ठेवणं चांगलं, असं आवाहन करण्यात येत आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: December 11, 2020, 8:50 PM IST

ताज्या बातम्या