Home /News /maharashtra /

कधी थांबणार हा कहर? राज्यभरातून आली सगळ्यात धक्कादायक आकडेवारी

कधी थांबणार हा कहर? राज्यभरातून आली सगळ्यात धक्कादायक आकडेवारी

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 2940 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. आजपर्यंतची ही दिवसभरातली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. दिवसभरात 63 मृत्यू नोंदले गेल्याने कोरोनाबळींची संख्या 1517 वर पोहोचली आहे.

    मुंबई, 22 मे : महाराष्ट्रात आतापर्यंतची एक दिवसांतली सर्वाधिक रुग्णांची वाढ शुक्रवारच्या आकड्यांमधून समोर आली. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2940 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. त्यातली सर्वाधिक वाढ अर्थातच मुंबईत दिसून आली. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 63 मृत्यू नोंदले गेल्याने कोरोनाबळींची संख्या 1517 वर पोहोचली आहे.राज्य सरकारने शुक्रवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 44582 वर पोहोचली आहे. दिवसभरातल्या 63 कोरोना मृत्यूंपैकी मुंबईत 27 आणि पुण्यात 9 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्णवाढीचे दररोज नवे उच्चांक समोर येत आहेत. आज एका दिवसातली सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत पुन्हा दिसून आली. 1751 रुग्ण गेल्या 24 तासांत मुंबईत आढळले. शहरात कोरोनाव्हायरसमुळे 27 मृत्यू नोंदले गेले.  मुंबईत कोरोनाव्हायरसचा धोका उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ठाण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असून ठाण्यात आज 186 नवे रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीतली ही मोठी वाढ आहे. मुंबई उपनगरांतली गेल्या 24 तासांतली रुग्णवाढ मुंबई - 1751 कल्याण डोंबिवली 86 ठाणे - 186 नवी मुंबई - 108 उल्हासनगर - 13 भिवंडी - 2 मीरा भाईंदर - 26 वसई विरार - 26 पुण्याचा धोकाही वाढला लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणल्याबरोबर पुण्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात पुण्यात तब्बल 298 रुग्णांची वाढ झाली. बरे झालेल्या रुग्णांमध्येही वाढ राज्यात आजपर्यंत एकूण 12583 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज झालेल्या 63 मृत्यूंपैकी मुंबईत 27 मृत्यू झाले आहेत. 24 तासांतले मृत्यू मुंबई - 27 पुणे - 9 जळगाव - 8 सोलापूर - 5 वसई-विरार - 3 औरंगाबाद - 3 सातारा, मालेगाव, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल आणि नागपूर शहरात प्रत्येकी 1 मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेत घडली भयंकर घटना, मृतदेह 3 तास रस्त्यावरच पडून मुंबईत अखेर उद्यापासून सुरू होणार दारूची होम डिलिव्हरी; दुकानं राहणार बंदच
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या