मुंबई, 6 ऑगस्ट : राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 11,514 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. पण राज्यात नव्या रुग्णांचं प्रमाण मात्र कमी व्हायचं नाव घेत नसल्यामुळे Covid संकट कधी कमी होणार हे कळायला मार्ग नाही.
आज दिवसभरात 10854 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण तीन लाख 16 हजार 375 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.94 टक्के एवढे झालेलं आहे. दिवसभरातल्या मृत्यूंचा आकडाही गेल्या काही दिवसांत वाढलेला आहे. राज्यात आज 316 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.50 टक्के एवढा आहे.
राज्यात नऊ लाख 76 हजार 332 व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत, तर 37,768 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण मध्ये आहेत
गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात आज उच्चांकी वाढ झाली.
आज नोंदल्या गेलेल्या 316 मृत्यूंपैकी गेल्या 48 तासांमध्ये झालेले 246 आहेत. तर 44 गेल्या आठवड्याभरातले आहेत. उरलेले 26 त्यापूर्वी झालेले मृत्यू आहेत.
राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,79,779 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 16,792 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,46,305 रुग्ण आहेत.
एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.52 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 3 टक्क्यांच्या खाली आहे.
Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे.
6 ऑगस्टची आकडेवारी
अॅक्टिव्ह रुग्ण - 1,46,305
24 तासांतली वाढ - 11,514
बरे झालेले रुग्ण -3,16,375
एकूण मृत्यू -16,792
एकूण रुग्ण - 4,79,779
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार
पुणे 41000
ठाणे 27012
मुंबई 20546
पालघर 6309
नाशिक 6037
कोल्हापूर 4644
रायगड 4580
नागपूर 4588
औरंगाबाद 4545