मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Coronavirus : राज्यात आज पुन्हा 10 हजारांवर नवे रुग्ण; मृत्यूंची संख्याही जास्त

Coronavirus : राज्यात आज पुन्हा 10 हजारांवर नवे रुग्ण; मृत्यूंची संख्याही जास्त

रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, लक्षण दिसल्यानंतर कोरोना व्हायरसचा विषाणूचं अनुवांशिक मेटिरिअल आणि RNA रुग्णाच्या घश्यात किमान 17 ते 83 दिवस असतं. पण हे RNA संसर्गजन्य राहत नाही. संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, PCR चाचणीत हा RNA कमकुवत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 9 दिवसांनंतर विषाणूचा प्रसार होऊ शकतं नाही.

रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, लक्षण दिसल्यानंतर कोरोना व्हायरसचा विषाणूचं अनुवांशिक मेटिरिअल आणि RNA रुग्णाच्या घश्यात किमान 17 ते 83 दिवस असतं. पण हे RNA संसर्गजन्य राहत नाही. संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, PCR चाचणीत हा RNA कमकुवत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 9 दिवसांनंतर विषाणूचा प्रसार होऊ शकतं नाही.

आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा 10 हजारांहून अधिक संख्येने नवे Corona रुग्ण सापडले. याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे.

    मुंबई, 5 ऑगस्ट : आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा 10 हजारांहून अधिक संख्येने नवे Corona रुग्ण सापडले. याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यातच पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. 1 ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओम अर्थात mission begin again ची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून (Coronavirus maharashtra updates) धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10,309 कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे. आज नोंदल्या गेलेल्या 334 मृत्यूंपैकी गेल्या 48 तासांमध्ये झालेले 242 आहेत. तर 60 गेल्या आठवड्याभरातले आहेत. उरलेले 32 त्यापूर्वी झालेले मृत्यू आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,68,265 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 16,476 वर गेला आहे. दिवसभरात 334 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,45,961 रुग्ण आहेत. एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.52 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 3 टक्क्यांच्या खाली आहे. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात साडेचार लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 3,05,521 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 5 ऑगस्टपर्यंतची आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्ण - 1,45,961 24 तासांतली वाढ - 10,309 बरे झालेले रुग्ण -3,05,521 एकूण मृत्यू -16,476 एकूण रुग्ण - 4,68,265 सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे.एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाणही मुंबईत मोठं आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार पुणे 39385 ठाणे 30406 मुंबई 20679 पालघर 6233 नाशिक 5843 रायगड 4689 औरंगाबाद 4674
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या