मुंबईची रुग्णसंख्या झाली 25500; पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं

Mumbai: Migrants wait to fill up forms at Dharavi police station to travel to their native places, during the ongoing COVID-19 lockdown, in Mumbai, Saturday, May 2, 2020. (PTI Photo)(PTI02-05-2020_000172B) *** Local Caption ***

राज्यात आतापर्यंत 41,642 रुग्ण आढळले आहेत. पण त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे, असं थोडं दिलासादायी चित्र राज्य सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीत दिसलं.

  • Share this:
    मुंबई, 21 मे : राज्यात आज दिवसभरात 64 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, यात सर्वाधित 41 मृत्यू मुंबईत नोंदले गेले. मुंबईच्या रुग्णसंख्येने 25500 चा आकडा ओलांडला आहे. पण त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे, असं थोडं दिलासादायी चित्र राज्य सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीत दिसलं. अजूनही देशभरात महाराष्ट्रातली कोरोनारुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढते आहे. त्यातही मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. राज्यात आतापर्यंत 41,642 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1454 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 22500 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत मुंबईत 882 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 2345 नवीन रुग्णांची भर पडली. तर 1408 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत राज्यात 11726 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 97 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 1560 झाली आहे रोजा सोडण्यासाठी जेवण घ्यायला जाताना भरबाजारात दहशतवाद्यांचा हल्ला, जवान शहीद आज दिवसभरात पुण्यात 208 बाधित रुग्ण वाढले आणि 7 जण मृत्युमुखी पडले. 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत पुण्यात एकूण 4107 कोरोनाग्रस्तांनी नोंद झाली आहे. उद्यापासून एसटी सुरू होणार राज्यातला रेड झोन आणि प्रतिबंधित क्षेत्राचा भाग वगळता अन्यत्र उद्यापासून एसटीची सेवा सुरू होणार आहे. एस टीची जिल्हाअंतर्गत सेवा जवळपास 2 महिने बंद होती. ती उद्यापासून सुरू होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 याच वेळात एसटी बस धावेल. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून फक्त निम्म्या सीटच भरल्या जातील, असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी सांगितलं. अन्य बातम्या महाराष्ट्राची लालपरी उद्यापासून पुन्हा धावणार, प्रवास करण्यासाठी असतील 'हे' नियम गावी जाण्यासाठी घर सोडलं आता कुठे जाऊ? मजुरांचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी मुंबईबाबत धोका व्यक्त करत देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारबद्दल म्हणाले...
    First published: