मुंबई, 20 मे : राज्यात कोरोनाव्हायरस (Coronavirus) चा कहर वाढत असला, तरी एक दिलासादायक आकडा आज समोर आला आहे. आतापर्यंत राज्यातल्या 10,318 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या 24 तासात 679 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात 65 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातले 41 मुंबईतले,नवी मुंबईतले 3, उल्हासनगर 2, पुण्यातले 13, पिंपरी चिंचवड 2,औरंगाबाद - 2, सोलापूर - 2 असे रुग्ण दगावले आहेत. आज राज्यात 2250 रुग्णांचं नव्याने निदान झालं.
2250 new #COVID19 cases & 65 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 39297, including 27581 active cases and 1390 deaths: State Health Department pic.twitter.com/kzb8rUQER9
— ANI (@ANI) May 20, 2020
आतापर्यंत महाराष्ट्रात 39,297 कोरोनारुग्ण सापडले आहेत. हा आकडा मोठा असला, तरी त्यातले बरे होणारे रुग्णही वाढत आहेत. आतापर्यंत 1390 रुग्णांचं Covid-19 मुळे निधन झालं आहे. आतापर्य़ंत 3 लाख 7 हजार 72 जणांची COVID-19 चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
वर्षभरात कोरोना व्हायरस होणार नष्ट, 6 महिन्यांमध्ये येणार बाजारात औषध!
दरम्यान गेले 2 महिने लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली रेल्वे सेवा 1 जूनपासून सुरू होत आहे आणि विमानसेवाही लवकरच सुरू होणार आहे. यानंतर कोरोनारुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा देण्यात येत आहे.
अन्य बातम्या
Lockdown : गुजरातमधून मृतदेह आणला पण राज्याच्या सीमेवरच केले अंत्यसंस्कार
बापरे! मुंबईतल्या KEMमधल्या शवगृहात मृतदेहांसाठीही वेटिंग लिस्ट
Cyclone Amphan : पहिल्या 4 तासांतच चक्रीवादळाचा कहर; 2 महिलांचा बळी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.