पुनःश्च हरिओम म्हणायच्या दिवशीच राज्यातून आली धक्कादायक आकडेवारी; पुण्यात नोंदले उच्चांकी मृत्यू

पुनःश्च हरिओम म्हणायच्या दिवशीच राज्यातून आली धक्कादायक आकडेवारी; पुण्यात नोंदले उच्चांकी मृत्यू

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 11,147 एवढ्या उच्चांकी (Covid Spike) कोरोनारुग्णांचं निदान झालं.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : 1 ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओम अर्थात mission begin again ची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून (Coronavirus maharashtra updates)  धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.  गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 11,147 एवढ्या उच्चांकी (Covid Spike) कोरोनारुग्णांचं निदान झालं.  गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे. पुण्यात गेल्या 24 तासांत 52 रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच ही भीषण आकडेवारी आली आहे.

नव्या नियमावलीप्रमाणे राज्यात 5 ऑगस्टपासून शॉपिंग मॉल सुरू होणार आहे. पण राज्यात वेगाने Covid रुग्ण वाढत आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,11,798 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 14729 वर गेला आहे. दिवसभरात 266लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,48,150 रुग्ण आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे.

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्ष पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,94,253 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

30 जुलै पर्यंतची आकडेवारी

अॅक्टिव्ह रुग्ण - 1,48,150

24 तासांतली वाढ - 11,147

बरे झालेले रुग्ण - 2,48,615

एकूण मृत्यू -14729

एकूण रुग्ण - 4,11,798

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्याला पुण्याने या बाबतीत मागे टाकलं आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाणही मुंबईत मोठं आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक Coronavirus चे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

पुणे 48815

ठाणे 31923

मुंबई 20158

पालघर 5801

औरंगाबाद 5414

नाशिक 5356

रायगड 5142

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 30, 2020, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading