आकडे बघून धक्का बसेल; पण Covid-19 च्या जागतिक साथीने आपल्या राज्यात घेतलेत अर्धा लाख बळी!

आकडे बघून धक्का बसेल; पण Covid-19 च्या जागतिक साथीने आपल्या राज्यात घेतलेत अर्धा लाख बळी!

Coronavirus चं गंभीर रूप देशासमोर आलं त्याला बरोबर 9 महिने उलटले आहेत. मोदींनी देशव्यापी Lockdown 25 मार्चला जाहीर केला होता. या जागतिक महासाथीने महाराष्ट्रात सर्वाधिक बळी घेतले आहेत. अनेक घरांनी या साथीत आप्त गमावले आहेत.. पाहा धक्कादायक आकडेवारी

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : Coronavirus आटोक्यात आला. नवीन Coronavirus मुळे धोका वाढला, पण रिकव्हरी रेटही वाढला, कोरोना लस लवकरच येणार, महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे रुग्ण झाले कमी, मृत्यूदर खाली आली... दररोज अशा अनेक बातम्या वाचून तुमच्यातही Covid-19 या विषयाबद्दल एक प्रकारची बधीरता आली असेल. पण वरवर दिसणारे हे दैनंदिन अपडेट किंवा आकडेवारी प्रत्यक्षात भयावह आहे आणि विचार करायला लावणारी आहे. वाचून धक्का बसेल पण; महाराष्ट्रात या जागतिक साथीने आतापर्यंत अर्धा लाख बळी घेतले आहेत.

कोरोनाचा मृत्यूदर आता राज्यात कमी झाला असल्याचं सांगितलं जातं. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या दर 100 पैकी 2.57 लोकांचा मृत्यू होतो. टक्केवारीच्या हिशोबाने हा आकडा छोटा वाटत असला, तरी तो लहान वाटण्यामागे राज्याचा महाकाय आकार, प्रचंड लोकसंख्या हे कारण आहे. प्रत्यक्षात राज्यात आतापर्यंत 49,129 लोकांचा बळी या आजाराने घेतला आहे. फक्त 9 महिन्यांतली ही संख्या आहे आणि या दृष्टीने विचार केला तर मोठा आकडा आहे.

धारावीकडून मुंबईकरांना 'ख्रिसमस गिफ्ट', 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Coronavirus चं गंभीर रूप देशासमोर आलं त्याला बरोबर 9 महिने उलटले आहेत. मोदींनी देशव्यापी Lockdown 25 मार्चला जाहीर केला होता. या जागतिक महासाथीने महाराष्ट्रात सर्वाधिक बळी घेतले आहेत. अनेक घरांनी या साथीत आप्त गमावले आहेत.. पाहा धक्कादायक आकडेवारी

आतापर्यंतची आकडेवारी

राज्यातली कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या 19,13,382

आतापर्यंतचे कोरोना बळी - 49,129

एकट्या मुंबईतले कोरोना बळी - 11,056

गेल्या 24 तासांत राज्यात झालेले मृत्यू - 71

आजच्या घडीला उपचाराधीन रुग्णसंख्या - 56,823

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना निदान झालेले रुग्ण - 3,431

राज्याचा मृत्यूदर - 2.57%

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ घसरतो आहे. नव्या रुग्णांच्या संख्येतही फारशी वाढ दिसत नसून 3 ते 4 हजारंच्या दरम्यान दररोज नवे रुग्ण आढळत आहेत.  पण परिस्थिती आटोक्यात आलेली असताना या साथीने आतापर्यंत किती नुकसान केलं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक कंबरडं तर मोडलंच, पण प्रत्येक घरात या साथीने दहशक निर्माण केली, हे नाकारता येणार नाही.  राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना कहर जास्त होता. अजूनही कोरोनाची भीती मोठ्या शहरांमध्येच अधिक आहे. या शहरातल्या प्रत्येक घराने जवळचे मित्र, नातेवाईक किंवा आप्तांपैकी कुणाला तरी या साथीने गाठलेलं पाहिलेलं आहे. त्यातल्या काहींनी आप्त गमावलेही आहेत. त्यामुळे ग्राफ खाली आला म्हणून बिनधास्त होताना या गोष्टींकडेही आणि या आकड्यांकडेही डोळे उघडे ठेवून पाहायला हवे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: December 25, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या