आंतरराष्ट्रीय कंपनीलाही टाकेल मागे, सांगलीच्या इंजिनिअर दाम्पत्याने बनवले व्हेंटिलेटर!

आंतरराष्ट्रीय कंपनीलाही टाकेल मागे, सांगलीच्या इंजिनिअर दाम्पत्याने बनवले व्हेंटिलेटर!

सांगलीत एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना या व्हेंटिलेटरचा वापरही करण्यात आला आहे.

  • Share this:

आसिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 06 एप्रिल : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक देशामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आकडा भीषण असून तो अजून वाढत आहे. जगात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आणि जेवढे रुग्ण वाढले तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्यानं मृत्यूचा आकडा वाढत आहे.

हाच धोका भारतात आणि महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो. नेमका हाच धोका ओळखून वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या सांगलीतील प्रसाद आणि आदिती कुलकर्णी या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या दाम्पत्याने स्वदेशी कंप्रेसर चलीत व्हेंटिलेटर बनवला आहे.

हेही वाचा - कोरोना काळातला भयावह VIDEO, भुकेपोटी कोंबड्याच कोंबड्यांना खात आहे मारून!

सांगलीत एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना या व्हेंटिलेटरचा वापरही करण्यात आला आहे. वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या या दाम्पत्याने कोरोनाचा महाराष्ट्रभरात वाढता प्रादुर्भाव आणि व्हेंटिलेटरची असलेली कमी या सर्व पार्श्वभूमीवर प्रयोग करत या व्हेंटिलेटरची निमिर्ती केली आहे. गंभीर संसर्ग झालेल्या कोविड रूग्णाला व्हेंटिलेटरची जास्त आवश्यकता असते.

मात्र, बाहेरच्या देशात फक्त जितक्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले त्या प्रमाणात व्हेंटिलेटर नसल्याने त्या देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमान वाढले असे दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आणि देशात कोरोनाचे झपाट्याने वाढत असलेले रुग्ण पाहता आपल्याकडे देखील व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे गरजेचं आहे.

हेही वाचा - 'मृत्यूंची संख्या वाढत आहे...आता तरी गांभीर्य ओळखा', अजित पवारांचं आवाहन

प्रसाद आणि आदिती कुलकर्णी या अभियंता जोडप्याला वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचा सुमारे दोन दशकांचा अनुभव आहे.  या जोडप्याने सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होईल असे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचेच रिझल्ट देणारे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर तयार केले आहे.

शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, सांगलीतील कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या व्हेंटिलेटरची पाहणी केली आहे. त्यांनी सुचवलेले बदल करुन पुन्हा हे मशीन मान्यतेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीला दाखवले आहे. त्यांची मान्यता आल्यानंतर या मशिनचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.

First published: April 6, 2020, 5:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या