Home /News /maharashtra /

पोहायला गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना

पोहायला गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना

कोलदरे व परिसरात या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे, 22 मे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या कोलदरे येथील रहिवासी व मुंबईतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आलेले उल्हास हिरामण काळे (वय 42 वर्षे) व रोहन राजेंद्र काळे (वय 18 वर्षे) या चुलत्या-पुतण्याचा घोड नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. कोलदरे व परिसरात या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हास काळे व रोहन काळे यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी गावी आले होते. रोहनने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. उल्हास यांचा मुंबई येथे कॉम्प्युटर स्पेअर पार्टचा व्यवसाय होता. घोडनदीवर म्हसोबाचा डोह येथे आज दुपारी एकच्या सुमारास हे दोघे पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर इतर तीन लहान मुले होती. उल्हास व रोहन काळे हे पोहण्यासाठी नदीत उतरले पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तीरावर उभी असलेली त्यांच्या घरातील इतर तिघांनी आरडाओरडा केला. घरी मोबाईल वरून फोन केले. पुढील पंधरा ते वीस मिनिटात गावातून नागरिक आले हेही वाचा - कोरोनाचं संकट वाढत असताना पुणे जिल्ह्यात समोर आला खळबळजनक प्रकार गावातील नागरिकांनी दोघांनाही खासगी गाडीतून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतापराव चिंचोलीकर यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Lockdown, Pune news

पुढील बातम्या