Home /News /maharashtra /

पप्पा आईला टिफीन द्या...कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस अधीक्षकाच्या मुलीनं केला हट्ट

पप्पा आईला टिफीन द्या...कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस अधीक्षकाच्या मुलीनं केला हट्ट

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या यशामागे आणि त्यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या पाठीशी त्यांचे पती खंबीरपणे उभे आहेत.

  सातारा, 17 एप्रिल : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रत्येक पातळीवर प्रयत्नशील आहेच. त्यासोबतच डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अहोरात्र सेवा करत आहेत. ड्युटीपलीकडे जाऊन लोकांची मदत करताना पाहायला मिळत आहेत. कोरोना आपल्या घरात येऊ नये म्हणून या सर्वांनाच खूप जास्त काळजी घ्यावी लागत आहे. घरापासून लांब आपलं कर्तव्य निभावणाऱ्या कोरोना वॉरियर्सला खरा सलाम आहेच. नेहमी आपण ऐकतो किंवा म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा पाठिंबा असतो हात असतो पण साताऱ्यात नेमकं याच्या उलट पाहायला मिळालं आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या यशामागे आणि त्यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या पाठीशी त्यांचे पती खंबीरपणे उभे आहेत. पोलीस खात्यातील नोकरी आणि कोरोनाविरुद्धच्या ले.ढाईत अहोरात्र काम आणि होणारी दगदग यासगळ्यामध्ये तेजस्वी सातपुते यांना मुलीपासून आणि घरापासून लांब राहावं लागत आहे. हे वाचा-खूशखबर! तब्बल 6 भारतीय कंपन्यांनी शोधलं कोरोनावर औषध पण... तेजस्वी यांना 6 वर्षांची मुलगी आहे. तिची संपूर्ण जबाबदारी सध्या तेजस्वी यांचे पती आपलं काम बाजूला ठेवून सांभाळत आहेत. पत्नी तेजस्वी यांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहकार्य करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. घरकामापासून ते मुलीचं सगळं करण्यापर्यंत त्यांचे पती जातीनं स्वत: सगळीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाई सातपुते दाम्पत्य मिळून लढत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लॉकडाऊन आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कामाचा ताण तेजस्वी यांच्यावर सर्वात जास्त आहे. काहीवेळी खाणं जेवणंही त्यांचं नीट होत नाही. काम आटपून एका संध्याकाळी तेजस्वीनी घरी जेवणासाठी आल्या त्यावेळी त्यांना अचानक मिटिंगसाठी पुन्हा जावं लागल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या मुलीची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची मुलगी रडत होती. तिने वडिलांकडे आईला रोज डबा द्या म्हणजे तिचं जेवण तरी होईल असा हट्ट धरला. वडिलांनी तिची समजूत घातली. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सातपुते कुटुंबायांनी स्वत:ला वाहून घेतलं आहे. तर तेजस्वी यांचे पती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे वाचा-स्पेनमध्ये तासाला 20 लोकांचा होतोय मृत्यू, संपूर्ण गाव तयार करतंय शवपेट्या

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Coronavirus, Satara, Symptoms of coronavirus

  पुढील बातम्या