'जे जागे असतील तेच वाचतील', अफवा पसरली आणि अख्खं गाव रात्रभर झोपलंच नाही!

'जे जागे असतील तेच वाचतील', अफवा पसरली आणि अख्खं गाव रात्रभर झोपलंच नाही!

सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या तरुणांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • Share this:

बीड, 26 मार्च : कोरोना संदर्भात आता ग्रामीण भागांमध्ये अफवांना मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहेत. 'या गावात कोरोनाचे रुग्ण सापडले, त्या गावात अमूक एकाला कोरोना झाला', अशा अफवा बीड जिल्ह्यात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या तरुणांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

आष्टी तालुक्यातील दोघांवर कारवाई केल्यानंतर आता पोलीस सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून परळी व इतर ठिकाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत. काल रात्री परळी तालुक्यात अशीच एक अफवा पसरवण्यात आली.

'जी माणसं झोपेमध्ये असतील ती झोपलेलीच राहतील आणि जागी असतील तीच वाचतील,' असा मेसेज व्हायरल करण्यात आला होता. यासाठी फेक व्हिडिओ आणि फोटोचा दाखल देण्यात आला. यामुळे परळी तालुक्यातील अनेक गावांमधील लोक रात्रभर जागे होते. तसंच नातेवाईकांना फोन करून जागे राहण्याबाबतीत सल्ले देत होते.

हेही वाचा-मुंबईच्या चाळीत पोहोचला Coronavirus; या 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर

दरम्यान, यामुळे अशा पोस्ट व्हायरल करणार्‍यावर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीत बीडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.

कोरोनाची धास्ती, मुंबईत झाला खून

राज्यात आणि देशातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचं संकट गडद होत असताना लोकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबईतून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन असताना तू घराबाहेर का गेला होतास? असा प्रश्न विचारणाऱ्या लहान भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याची घटना घडली आहे.

लॉकडाउनमध्ये मोठा भाऊ आणि वहिणी घराबाहेर भाजीपाला घ्यायला गेले. त्यानंतर घरी परत आल्यावर लॉकडाऊन असताना तुम्ही दोघे बाहेर का गेला होता? अशी विचारणा लहान भावाने केली. त्यावर 'तू आम्हाला शिकवू नकोस, काय करायचे आहे ते आम्हाला चांगले माहीत आहे,' असं बोलून मोठा भाऊ लहान भावाशी वाद घालू लागला.

हा वाद इतका विकोपाला गेला की मोठ्या भावाने घरातील लोखंडी तवा लहान भावाच्या डोक्यात मारला. ज्यामध्ये लहान भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पशुपतीनाथ दुबे चाळ, सिद्धी विनायक मैदानाजवळ, गावदेवी रोड, पोयसर कांदिवली पुर्व मुंबई येथे घडली असून यामुळे कांदिवलीत एकच खळबळ उडाली आहे. दुर्गेश लक्ष्मी ठाकूर वयं 21 वर्षे हे खून झालेल्या लहान भावाचे नाव असून दुर्गेशच्या हत्येप्रकरणी त्याच्या 28 वर्षीय मोठ्या भावाला अटक करण्यात आली आहे

First published: March 26, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading