पुणे तिथे काय उणे..,लॉकडाउनमध्ये कॉल ऑन दारूची बाटली?

पुणे तिथे काय उणे..,लॉकडाउनमध्ये कॉल ऑन दारूची बाटली?

पुण्याच्या उत्पादन शुल्क आणि सायबर क्राइम पोलिसांकडे याबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे.

  • Share this:

पुणे, 06 एप्रिल : पुणे तिथे काय उणे...असं उगाच म्हटलं जात नाही. कारण, कोरोना सारख्या महासंकटातही पुणेकर काय मार्ग काढतील याचा नेम नाही. लॉकडाउनमुळे तळीरामांचे चांगलेच वांदे झाले आहे. पण, यावरही पुणेकरांनी जालीम तोडगा काढला आहे. परंतु, पुणे पोलिसांनी यावर स्पष्ट खुलासाही केला आहे.

महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यातच मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. खबरदारी म्हणून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये घरपोच दारू देतो सांगून 30 हजारांचा ऑनलाइन गंडा

14 एप्रिल पर्यंत राज्यात ड्राय डे ही घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या लोकांची पुरती गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी लोकं चोरून दारूची विक्री करत आहे. तर कुठे परराज्यातून दारूची तस्करी केली जात आहे.

पण, अशा परिस्थितीत पुण्यातील काही वाईन शॉप चालकांनी घरपोच दारू पोहोचवण्याची सोय केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फेसबुक पोस्टवर मोबाईल नंबर शेअर करून दारूची ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला बाटली घरपोच आणून दिली जाईल, अशी नामी शक्कल लढवली आहे. काही जणांनी तर ऑनलाईन पेंमटचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा -VIDEO: वडिल सलीम खान यांना नाही भेटू शकत सलमान खान, म्हणाला 'मी खूप घाबरलोय'

परंतु, अशा प्रकारातून फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.  पुण्याच्या उत्पादन शुल्क आणि सायबर क्राइम पोलिसांकडे याबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे.  मुळात दारू विक्रीसाठी 14 एप्रिलपर्यंत मनाई करण्यात आली आहे. असा कोणताही प्रकार सुरू असल्याचं आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, तळीरामांचा धीर आता सुटत चालला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूरमध्ये दारुड्यांनी देशी दारूचे दुकान फोडून बाटल्या पळवून नेल्या आहे. तर नागपूरमध्येही आतापर्यंत 4 बिअरबार फोडण्यात आल्याची घटना घडली आहे.

First published: April 6, 2020, 11:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या