VIDEO खेळ मांडला! रस्त्यावरच रंगला पत्त्यांचा डाव, नागरिकाच्या तक्रारीनंतर 5 मिनिटांत पोलिसांचे उत्तर
VIDEO खेळ मांडला! रस्त्यावरच रंगला पत्त्यांचा डाव, नागरिकाच्या तक्रारीनंतर 5 मिनिटांत पोलिसांचे उत्तर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहनही प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र तरीही काही लोकांना याचं गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे.
मुंबई, 02 एप्रिल : कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहनही प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र तरीही काही लोकांना याचं गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनीही अशा लोकांवर कठोर कारवाई केली आहे. काहीवेळा नाइलाजास्तव पोलिसांकडून लाठीमारही केला जातो. अत्यावश्यक सेवेची कारणं सांगून लोक रिकाम्या रस्त्यावरून गाडीने फेरफटका मारत असल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसला लढत असताना नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. याबाबत जागरूक नागरिक तक्रार करताना दिसत आहेत.
घरातून बाहेर पडू नका, गर्दीत जाणं टाळा असे सांगण्यात आलं असतानाही काही लोक एकत्र येत असल्याचं बघायला मिळतं. मुंबईत कांदिवलीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्याकडेला एका झाडाखाली लोकांनी पत्त्यांचा खेळ मांडल्याचं दिसतं. हा व्हिडिओ एका युजरनं शेअर करून त्यामध्ये मुख्यमंत्री, बीएमसी, मुंबई पोलीस यांना टॅग केलं आहे.
रस्त्यावर ज्याप्रमाणे पोलीस दक्ष आहेत तसंच सोशल मीडियावरही त्यांची करडी नजर आहे. मुंबई पोलीसांनी युजरने शेअर केलेल्या व्हिडिओवर 5 मिनिटांच्या आत रिप्लाय देत संबंधितांवर कारवाई करू. याची माहिती मेन कंट्रोल रुमला दिली आहे असं म्हटलं.
हे वाचा : Lockdown मधे पोलिसांनी शहीदांच्या घरी पोहोचवली मदत, रडत आई म्हणाली...
दरम्यान, कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले असून मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 62वर गेली आहे. महाराष्ट्रात रुग्णांची एकूण संख्या आता 416वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांच मुंबईत 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचा : 'माझीसुद्धा ड्युटी लावा, मला कोरोनाशी लढायचं आहे', वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.